आज सफला एकादशी! 'या' वेळेत पूजा केल्याने होतील सर्व इच्छा पूर्ण, आत्ताच नोट करा शुभ मुहूर्त, पूजा विधी अन् वेळ

Last Updated:

हिंदू पंचांगानुसार, आज, सोमवार, 15 डिसेंबर 2025 रोजी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाची सफला एकादशी आहे. ही एकादशी वर्षातील शेवटच्या एकादशींपैकी एक आहे.

News18
News18
Saphala Ekadashi : हिंदू पंचांगानुसार, आज, सोमवार, 15 डिसेंबर 2025 रोजी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाची सफला एकादशी आहे. ही एकादशी वर्षातील शेवटच्या एकादशींपैकी एक आहे. 'सफला' नावाप्रमाणेच हे व्रत पाळणाऱ्या भक्तांना जीवनात यश, सुख आणि समृद्धी प्राप्त होते, तसेच त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हे व्रत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. अंकशास्त्र आणि ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, आज एकादशीच्या दिवशी केलेले विशेष उपाय अत्यंत फलदायी ठरतात.
पूजा विधी आणि महत्त्व : सफला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो स्थापित करून त्याची पंचामृताने पूजा करावी. विष्णूंना तुळस, पिवळी फुले, फळे आणि धूप-दीप अर्पण करावा. विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
शुभ मुहूर्त : सफला एकादशीची तिथी 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजून 57 मिनिटांनी सुरू झाली आहे आणि ती 16 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 08 वाजून 08 मिनिटांपर्यंत राहील.
advertisement
पूजा करण्याचा सर्वोत्तम काळ : सफला एकादशी ही सर्वात शुभ एकादशी मानली जाते. अशातच या एकादशीची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम काळ नेमकं कोणता असा प्रश्न जर तुम्हालाही पडला असेल तर, त्याच उत्तर आम्ही देतो. सफला एकादशीची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम काळ आज, 15 डिसेंबर, दिवसभर असेल.
पारण (व्रत सोडण्याची) वेळ : जर तुम्हीही आज सफला एकादशीचे व्रत किंवा उपवास केला असेल तर, या एकादशीचा उपवास सोडण्याची योग्य वेळ म्हणजे. एकादशीचे व्रत दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीमध्ये सोडले जाते.
advertisement
पारण वेळ : 16 डिसेंबर 2025, सकाळी 08 वाजून 08 मिनिटांपासून ते सकाळी 09 वाजून 05 मिनिटांपर्यंत. या वेळेतच अन्न ग्रहण करावे.
व्रत आणि नियम : या दिवशी तांदूळ, मांस आणि मद्य सेवन पूर्णपणे वर्ज्य करावे. फलाहार करून किंवा निर्जला व्रत ठेवून उपवास करावा. रात्रभर जागरण करून विष्णूचे भजन करावे.
advertisement
मनोकामना पूर्तीसाठी उपाय : आजच्या दिवशी भगवान विष्णूंना बेलाची फळे अर्पण करावी. यामुळे मोक्ष प्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे. तुळशीला नैवेद्य अर्पण करणे अत्यंत शुभ आहे.
गरीबांना दान : या शुभ दिवशी गरिबांना पिवळ्या रंगाचे वस्त्र, गूळ आणि हरभऱ्याची डाळ दान करणे पुण्यकारक मानले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी आणि धनलाभ होतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
आज सफला एकादशी! 'या' वेळेत पूजा केल्याने होतील सर्व इच्छा पूर्ण, आत्ताच नोट करा शुभ मुहूर्त, पूजा विधी अन् वेळ
Next Article
advertisement
BMC Election: निवडणूक आयोगाचा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत कधीही आचारसंहिता?
EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?
  • EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?

  • EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?

  • EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?

View All
advertisement