Vinayak Chaturthi: तू विघ्नहर्ता, गणपती बाप्पा मोरया! सर्वार्थ सिद्धी योगातील आजची विनायकी शुभ फळदायी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vinayak Chaturthi Vrat: विनायक चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. विनायक चतुर्थी तिथी २९ मे रोजी रात्री ११:१८ ते ३० मे रोजी रात्री ९:२२ पर्यंत आहे. सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग सकाळी ०५:२४ ते रात्री ०९:२९ पर्यंत आहेत. हे दोन्ही योग शुभ आणि यश देणारे मानले जातात.
मुंबई : दर महिन्याच्या विनायक चतुर्थी गणपतीची पूजा करण्याची परंपरा आहे. घरी किंवा मंदिरात जाऊन बाप्पाची विनायक चतुर्थी निमित्त पूजा केली जाते. ज्येष्ठ महिन्यातील विनायक चतुर्थीचा व्रत आज ३० मे रोजी आहे. विनायक चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. विनायक चतुर्थी तिथी २९ मे रोजी रात्री ११:१८ ते ३० मे रोजी रात्री ९:२२ पर्यंत आहे. सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग सकाळी ०५:२४ ते रात्री ०९:२९ पर्यंत आहेत. हे दोन्ही योग शुभ आणि यश देणारे मानले जातात.
विनायक चतुर्थी व्रतात दुपारी गणपतीची पूजा केली जाते. या विनायक चतुर्थीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी १०:५६ ते दुपारी ०१:४२ पर्यंत आहे. पूजेचे वेळी विनायक चतुर्थी व्रत कथा वाचावी. यामुळे उपवासाचे पूर्ण फायदे मिळतात. गणपती बाप्पाची शुभ मुहूर्तावर पूजा करणे लाभदायी मानले जाते. विनायक चतुर्थी ही प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येते. या दिवशी गणपतीची विशेष पूजा केली जाते.
advertisement
या दिवशी गणपतीला विघ्नहर्ता मानून त्याची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात, घरात सुख-समृद्धी येते. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणेशाची पूजा करणे महत्त्वाचे मानले जाते. विनायक चतुर्थीच्या दिवशी उपवास करणे आणि गणपतीची विधीवत पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी गणपतीच्या 108 नावांचा जप करणे लाभदायक ठरते.
advertisement
पूजा करण्याची पद्धत:
संकल्प: विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि गणपतीची पूजा करण्याचा संकल्प करावा.
मूर्तीची स्थापना: गणपतीची मूर्ती एका चौरंगावर स्थापित करावी.
स्नान आणि सजावट: मूर्तीला गंगेच्या पाण्याने स्नान करून चंदन, हळद, कुंकू आणि शेंदूर लावावे. फुलांनी आणि दुर्वांनी मूर्तीला सजवावे.
नैवेद्य: गणपतीला मोदक, लाडू किंवा आपल्या आवडीची मिठाई अर्पण करावी.
advertisement
मंत्रजप: "ओम गं गणपतये नमः" आणि "ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा" यांसारख्या गणेशाच्या विविध मंत्रांचा जप करावा.
दुर्वा अर्पण: गणपतीला 11, 21, 51 किंवा 108 दुर्वा अर्पण कराव्यात.
आरती: गणपतीची आरती करावी आणि त्यांना फुले अर्पण करावी.
प्रार्थना: आपल्या मनोकामना गणपतीसमोर व्यक्त कराव्यात. या पद्धतीने विनायक चतुर्थीची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि जीवनातील अडचणी दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 30, 2025 7:01 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vinayak Chaturthi: तू विघ्नहर्ता, गणपती बाप्पा मोरया! सर्वार्थ सिद्धी योगातील आजची विनायकी शुभ फळदायी