Sonam Raghuwanshi : बिच्चारा नाहक गेला! सोनमने फक्त 'या' कारणासाठी केला होता राजासोबत विवाह
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Sonam Raghuwanshi : इंदूरमधील व्यावसायिक राजा रघुवंशी याच्या हत्या प्रकरणात दररोज नवीन गोष्टींचा उलगडा होत आहे. शिलाँग पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. सगळे आरोपी हे शिलाँग पोलिसांच्या कोठडीत आहेत.
इंदूर: इंदूरमधील व्यावसायिक राजा रघुवंशी याच्या हत्या प्रकरणात दररोज नवीन गोष्टींचा उलगडा होत आहे. शिलाँग पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. सगळे आरोपी हे शिलाँग पोलिसांच्या कोठडीत आहेत. या दरम्यान आता आणखी एक नवीन दावा केला जात आहे. मनात नसतानाही सोनमला राजा रघुवंशीसोबत विवाह करावा लागला असल्याचा दावा करण्यात येत आहे.
सोनमने राजासोबत लग्नगाठ का बांधली?
सोनम आणि राजाच्या कुटुंबाचा दावा आहे की दोघांनीही कुटुंबाच्या संमतीने लग्न केले. तसेच, लग्नानंतर दोघेही खूप आनंदी होते. दरम्यान, काही माध्यमांच्या वृत्तानुसार सोनम या लग्नासाठी तयार नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. सोनमने या लग्नाला तिच्या कुटुंबाच्या दबावामुळे आणि प्रतिष्ठेमुळे तिने होकार दिला. सोनमचे वडील देवी सिंह रघुवंशी यांचा मोठा दबाव होता. राजाशी लग्न केले नाही तर मी आत्महत्या करेल, अशी धमकी सोनमला तिच्या वडिलांनी दिली होती, अशी माहिती समोर येत आहे.
advertisement
सोनमने लग्नाला होकार दिला
यानंतर सोनम रघुवंशी तिच्या वडिलांसमोर लग्नाला होकार दिला. मात्र, तिने तिच्या आईला धमकी दिली होती की जर तिने राजाशी लग्न केले तर त्याचे परिणाम सगळ्यांना दिसतील. त्यामुळे आता लग्न ठरल्यानंतरच सोनमने राजाला ठार मारण्याचा कट रचला होता का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर, दुसरीकडे काही दाव्यांनुसार, सोनमच्या घरातून भांडणाचे, वादाचे आवाज ऐकू येत होते. त्यामुळे या प्रकरणातील गूढ वाढले आहे.
advertisement
तू माझ्या मुलाला का मारले?
दरम्यान, राजा रघुवंशीचे कुटुंब अद्याप या धक्क्यातून सावरलेले नाही. राजाचे वडील अशोक रघुवंशी म्हणाले आहेत की, मला शिलाँगला जाऊन सोनमला विचारायचे आहे की माझ्या मुलाला का मारलं? त्यांनी सांगितले की मी तिला भेटायला तिथे जाईन. मला माझ्या मुलाची खूप आठवण येते. तो माझ्या स्वप्नात येतो, अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
advertisement
सोनम आणि राजाचे लग्न 11 मे रोजी झाले होते. त्यानंतर सोनम आणि राजा हनिमूनसाठी शिलाँगला गेले होते. राजा रघुवंशीची हत्या 23 मे रोजी शिलाँगमध्ये झाली. त्यानंतर सोनम रघुवंशी ही 9 जून रोजी उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये आढळली. पोलिसांनी तिला एका ढाब्यावरून ताब्यात घेतले.
Location :
Indore,Madhya Pradesh
First Published :
June 27, 2025 12:58 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Sonam Raghuwanshi : बिच्चारा नाहक गेला! सोनमने फक्त 'या' कारणासाठी केला होता राजासोबत विवाह