Sunita Ahuja: 'माझं घर उद्ध्वस्त होऊ देणार नाही', गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा मंदिरात जाऊन ढसाढसा रडली
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Govindas wife Sunita Ahuja : बॉलिवूडचा ‘हीरो नंबर वन’ गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांचं नातं नेहमीच चर्चेत असतं.काही महिन्यांपूर्वी त्यांच्या मतभेदांच्या आणि घटस्फोटाच्या अफवा जोरात होत्या.
मुंबई : बॉलिवूडचा ‘हीरो नंबर वन’ गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांचं नातं नेहमीच चर्चेत असतं.काही महिन्यांपूर्वी त्यांच्या मतभेदांच्या आणि घटस्फोटाच्या अफवा जोरात होत्या. एवढंच नव्हे तर, गोविंदा एका मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याच्याही कुजबुजांनी सोशल मीडियावर चांगलीच धूम माजवली होती. मात्र, या सगळ्याला अखेर दोघांनीही या अफवा फेटाळल्या. अशातच आता एका नव्या व्हिडीओमध्ये सुनीता आहुजा ढसाढसा रडताना दिसली.
अलीकडेच सुनीताने तिच्या आयुष्याचा एक वेगळा पैलू चाहत्यांसमोर आणला. तिने स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे आणि पहिल्याच व्लॉगमध्ये ती चंदीगडमधील मा कालीच्या मंदिरात गेली. व्हिडिओची सुरुवात हलक्या-फुलक्या अंदाजात होते. सुनीता म्हणते, “लोकांनी खूप पैसे छापले, आता नोटा छापण्याची माझी वेळ आहे.” यानंतर ती बाईकवरून मंदिरात पोहोचते, मध्येच दारू खरेदी करताना दिसते. पण, पुढच्या क्षणाला वातावरण गंभीर होतं
advertisement
सुनीता मंदिरात भटजींसमोर बोलताना भावूक होते आणि डोळ्यात पाणी येतं. सुनीता सांगते, "लहानपणी आई मला महालक्ष्मी मंदिरात घेऊन जायची. ते मंदिर मला खूप आवडायचं. गोविंदाला पहिल्यांदा भेटले तेव्हा मी देवाला प्रार्थना केली 'माझं लग्न ह्याच्याशी व्हावं.' आणि माझी इच्छा पूर्ण झाली. आज माझ्याकडे दोन सुंदर मुलं आहेत."
advertisement
पण तिच्या डोळ्यातलं पाणी केवळ आठवणींसाठी नव्हतं. ती पुढे म्हणाली, "मी नेहमी पूजा-पाठ करते. पण आयुष्यात चढ-उतार येतातच. सध्या मी कठीण काळातून जातेय. मला माता राणीवर पूर्ण विश्वास आहे माझं घर उद्ध्वस्त होऊ देणार नाही. जो माझ्या कुटुंबाला नुकसान करेल, त्याला माता सोडणार नाही." सुनीताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहते तिच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 15, 2025 12:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Sunita Ahuja: 'माझं घर उद्ध्वस्त होऊ देणार नाही', गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा मंदिरात जाऊन ढसाढसा रडली