Disadvantage of Bathua: आरोग्यदायी चाकवत ‘या’ व्यक्तींसाठी ठरू शकते धोक्याची; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Disadvantages of bathua or Chakvat in Marathi: हिवाळ्यात फिट आणि तंदुरूस्त राहण्यासाठी आरोग्यदायी चाकवतीची भाजी खाणं फायद्याचं असलं तरीही ही भाजी सगळ्यांसाठीच फायद्याची ठरत नाही. आजच्या लेखात जाणून घेऊयात कोणते आजार असलेल्या व्यक्तींनी चाकवतीची भाजी खाणं टाळावं.
मुंबई : हिवाळ्यात अनेक प्रकारच्या पालेभाज्या बाजारात येतात. चाकवत ही सुद्धा हिवाळ्यात उगवणारी एक पालेभाजी आहे. हिमालयाच्या पश्चिम भागात व महाराष्ट्रात चाकवतीचं पीक घेतलं जातं. चाकवतीला उत्तर भारतात बथुआ या नावानं ओळखलं जातं. चाकवतीच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम अशी पोषक तत्वं आढळून येतात. त्यामुळे हिवाळ्यात फिट आणि तंदुरूस्त राहण्यासाठी चाकवतीची भाजी खाणं फायद्याचं ठरतं. मात्र असं जरी असलं तरीही अशी आरोग्यदायी चाकवतीची भाजी किंवा बथुआची भाजी सगळ्यांसाठीच फायद्याची ठरत नाही. आजच्या लेखात जाणून घेऊयात कोणत्या व्यक्तींसाठी चाकवतीची भाजी खाणं हे धोक्याचं ठरतं.
‘हा’ त्रास असलेल्या व्यक्तींनी चाकवतीपासून दूर रहावं.

सांधेदुखीचा त्रास
चाकवतीमध्ये ऑक्सॅलिक ॲसिडमध्ये भरपूर प्रमाणात आढळून येतं. त्यामुळे शरीरातल्या ॲसिडचं प्रमाण वाढून शरीरातल्या कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. ज्यांना संधिवात किंवा सांधेदुखीचा त्रास आहे अशांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारचं चाकवतीचं किंवा बथुआची भाजी संतुलित प्रमाणात खावी.
advertisement
पचनाचे विकार
चाकवतीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. त्यामुळे ज्यांना पचनाचे विकार आहेत त्यांच्यासाठी चाकवतीची भाजी फायद्याची ठरू शकत. मात्र अति तिथे माती या म्हणीप्रमाणे जर चाकवत जास्त प्रमाणात खाल्ली तर डायरियासारखा आजार होण्याची भीती असते.
advertisement
त्वचा विकार
विविध त्वचा विकार किंवा ऍलर्जी असणाऱ्या व्यक्तींनी चाकवतीची भाजी खाणं टाळावं. कारण अधिक प्रमाणात ही भाजी खाल्ली तर विविध त्वचा विकारांचा सामना करावा लागू शकतो. बथुआच्या अतिसेवनामुळे त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे असे त्वचा विकार उद्भवू शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच चाकवतीची भाजी खावी.
advertisement
जशा नाण्याला दोन बाजू असतात तसंच चाकवतीचं सुद्धा आहे. चाकवतीमध्ये अनेक पोषकतत्त्वं आणि जीवनसत्वं जरी असली तरीही आरोग्यदायी चाकवत ही काही व्यक्तीसाठी धोक्याची ठरू शकते. त्यामुळे हिवाळ्यात येणारी ही पालेभाजी खाल्ल्यानंतर जर तुम्हाला काही त्रास झाला तर तो अंगावर न काढता किंवा त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 08, 2025 5:41 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Disadvantage of Bathua: आरोग्यदायी चाकवत ‘या’ व्यक्तींसाठी ठरू शकते धोक्याची; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात