Soup Premix Recipe : तीन महिने टिकणारं इन्स्टंट सूप प्री-मिक्स! हिवाळ्यासाठी परफेक्ट हेल्दी आणि टेस्टी रेसिपी

Last Updated:

Homemade instant lentil soup premix : बाजारातील महागड्या इन्स्टंट सूपऐवजी तुम्ही घरीच अतिशय खास आणि आरोग्यादायी सूप प्री-मिक्स पावडर बनवू शकता. विशेष म्हणजे, ही पावडर एअरटाईट कंटेनरमध्ये तब्बल 3 महिन्यांहून अधिक काळ साठवून ठेवता येते.

प्री-मिक्स पावडर बनवण्याची पद्धत..
प्री-मिक्स पावडर बनवण्याची पद्धत..
मुंबई : तुम्ही सूप पिण्याचे शौकीन असाल, पण कामामुळे किंवा वेळेअभावी इन्स्टंट पॅकेट्सचा आधार घेत असाल, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. बाजारातील महागड्या इन्स्टंट सूपऐवजी तुम्ही घरीच अतिशय खास आणि आरोग्यादायी सूप प्री-मिक्स पावडर बनवू शकता. विशेष म्हणजे, ही पावडर एअरटाईट कंटेनरमध्ये तब्बल 3 महिन्यांहून अधिक काळ साठवून ठेवता येते. जेव्हा कधी तुम्हाला आराम हवा असेल आणि त्वरित काहीतरी स्वादिष्ट आणि पौष्टिक खायची इच्छा असेल, तेव्हा हे प्री-मिक्स तुमच्या कामी येईल. हिवाळ्यात अनेकांना आळस येतो, या काळात हा सूप तुमच्यासाठी आणखी खास ठरू शकतो.
इन्स्टंट सूप प्री-मिक्स पावडर बनवण्यासाठी लागणारे साहित्य
मसूर डाळ - ½ वाटी
मूग डाळ - ½ वाटी
तूर डाळ – ½ वाटी
जिरे - 1½ चमचे
आख्खे धने - 1 मोठा चमचा
मोहरी - 1½ चमचे
सुख्या लाल मिरच्या - 2
काळी मिरी - 10 ते 12 दाणे
कढीपत्ता - 15 पाने
advertisement
लसूण पाकळ्या - 5 ते 8 (पर्यायी)
हळद - ½ चमचा
चवीनुसार मीठ
प्री-मिक्स पावडर बनवण्याची पद्धत..
डाळी भाजणे
- मूग, तूर आणि मसूर डाळ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्या.
- यानंतर लो फ्लेमवर (मंद आचेवर) ही डाळ हळूवारपणे भाजा.
- डाळी कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या आणि नंतर त्या पूर्णपणे थंड होऊ द्या.
advertisement
खडा मसाला भाजणे
- आता खडा मसाला (जिरे, धने, मोहरी, लाल मिरच्या, काळी मिरी) घ्या. त्यात कढीपत्ता आणि लसूण (लसूण वापरायचा नसल्यास वगळावा) घाला.
- तेल न वापरता, तव्यावर मंद आचेवर हे साहित्य कुरकुरीत आणि सुगंधित होईपर्यंत भाजून घ्या.
पावडर तयार करणे
- ड्राय रोस्ट केलेले खडा मसाला आणि डाळी एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्या.
advertisement
- या मिश्रणाची अगदी बारीक पावडर बनवून घ्या.
- शेवटी यात हळद आणि मीठ चवीनुसार मिसळा.
- तयार झालेली पावडर हवाबंद डब्यात भरून तीन महिन्यांपर्यंत साठवून ठेवू शकता.



 










View this post on Instagram























 

A post shared by Raksha Jain (@chatorehumtum)



advertisement
इन्स्टंट सूप बनवण्याची पद्धत
तुमचे सूप प्री-मिक्स तयार आहे. जेव्हा तुम्हाला सूप बनवायचे असेल, तेव्हा एका वाटीत 1 मोठा चमचा सूप प्री-मिक्स पावडर घ्या. त्यात गरम उकळलेले पाणी ओता आणि ते व्यवस्थित मिक्स करा जेणेकरून गाठी होणार नाहीत. यानंतर या सूपमध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची (पर्यायी) घालू शकता. वर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. शेवटी लिंबाचा रस पिळून गरम गरम सूपचा आनंद घ्या. हे पौष्टिक आणि झटपट सूप नक्की करून पहा आणि आळशी दिवसांचा आनंद घ्या.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Soup Premix Recipe : तीन महिने टिकणारं इन्स्टंट सूप प्री-मिक्स! हिवाळ्यासाठी परफेक्ट हेल्दी आणि टेस्टी रेसिपी
Next Article
advertisement
BMC Election: निवडणूक आयोगाचा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत कधीही आचारसंहिता?
EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?
  • EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?

  • EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?

  • EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?

View All
advertisement