हिरो राहिले बाजूला, खलनायकच बनला सुपरस्टार; रविवारी 'धुरंधर'ची रेकॉर्डब्रेक कमाई, 'छावा'-'पुष्पा 2' टाकलं मागे

Last Updated:
Dhurandhar Box Office Collection Day 10 : दुसऱ्या रविवारी 'धुरंधर' सिनेमानं रेकॉर्डब्रेक कमाई करण्यात यश मिळवलं आहे. सिनेमाचा खरा हिरो बाजूलाच राहिला, सर्वत्र खलनायक अक्षय खन्नाचीच चर्चा होतेय.
1/8
'छावा' आणि 'पुष्पा 2' नंतर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस हादरून गेलं आहे. 'धुरंधर' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करतोय. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या सिनेमानं 10 दिवसांत बॉक्स ऑफिसवर धुव्वा उडवून दिला आहे. 

advertisement
2/8
'धुरंधर' सिनेमानं पुन्हा एकदा हिरोची समीकरणं बदलली आहे. सिनेमात हिरोपेक्षा व्हिलनच भाव खाऊन जातोय.   सिनेमात हिरो रणवीर सिंग असला तरी खलनायक अक्षय खन्नाचीच सर्वत्र चर्चा पाहायला मिळतेय. अक्षय खन्नाच्या प्रभावी आणि थरारक अभिनयामुळे तो खऱ्या अर्थाने या सिनेमाचा सुपरस्टार ठरला आहे.

3/8
'धुरंधर'साठी दुसरा रविवार ऐतिहासिक ठरला. रिलीजच्या 10 व्या दिवशी चित्रपटाने भारतात तब्बल 58.20 कोटी नेट कमाई केली. ही कमाई आतापर्यंतच्या हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात मोठी रविवारची कमाई असल्याचं सांगितलं जात आहे.

4/8
सिनेमाची भारतामधील एकूण कमाई 364.60 कोटी नेटवर पोहोचली आहे. तर जगभरातील एकूण कमाई 552.70 कोटी झाली असून 'धुरंधर' सध्या ग्लोबल बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घालत आहे.

5/8
रिलीजच्या पहिल्या दिवसापासून धुरंधरची कमाई सातत्यानं वाढत गेली आहे. पहिल्या सोमवारपासूनच दररोज कमाईत वाढ होत गेली. मंगळवारी सोमवारपेक्षा अधिक, बुधवारी मंगळवारपेक्षा जास्त आणि हीच गती दुसऱ्या आठवड्यातही कायम राहिली. दुसरा शुक्रवार, शनिवार आणि रविवारीही सिनेमानं रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. 
[caption id="attachment_1561091" align="aligncenter" width="750"] रिलीजच्या पहिल्या दिवसापासून धुरंधरची कमाई सातत्यानं वाढत गेली आहे. पहिल्या सोमवारपासूनच दररोज कमाईत वाढ होत गेली. मंगळवारी सोमवारपेक्षा अधिक, बुधवारी मंगळवारपेक्षा जास्त आणि हीच गती दुसऱ्या आठवड्यातही कायम राहिली. दुसरा शुक्रवार, शनिवार आणि रविवारीही सिनेमानं रेकॉर्ड ब्रेक कमाई केली.</dd> <dd>[/caption]
advertisement
6/8
धुरंधरच्या यशामागे केवळ भव्य अ&#x200d;ॅक्शन किंवा दिग्दर्शन नाही तर अक्षय खन्नाचा धडाकेबाज खलनायकाचा रोल मोठं कारण ठरत आहे. सोशल मीडियावर 'धुरंधर'चा खलनायक हिरोपेक्षा जास्त चर्चेत आहे.

7/8
अनेक प्रेक्षक अक्षय खन्नाच्या अभिनयासाठी पुन्हा पुन्हा थिएटरमध्ये जात आहेत. त्यामुळेच हा चित्रपट ‘छावा’ आणि ‘पुष्पा 2’ सारख्या मोठ्या चित्रपटांनाही कमाईत मागे टाकत असल्याचं चित्र दिसत आहे.

8/8
दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत धुरंधर टॉपवर आहे. छावा सिनेमानं दुसऱ्या आठवड्यात 140.72 कोटींची कमाई केली होती. तर पुष्पा 2 ने हिंदीत 128 कोटी कमावले होते. छावा आणि पुष्पा 2चा रेकॉर्ड धुरंधरनं मोडला आहे.

BMC Election: निवडणूक आयोगाचा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत कधीही आचारसंहिता?
EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?
  • EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?

View All
advertisement