Mumbai Local update: बदलापूर-अंबरनाथ दरम्यान मालगाडीचे इंजिन फेल, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे हाल

Last Updated:

Mumbai Local Update: सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल- रेल्वे प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

मुंबई लोकल
मुंबई लोकल
Mumbai Local Update: गणेशोत्सवानिमित्ताने आधीच भाविकांची मुंबईत गर्दी आहे. त्याच दरम्यान मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांना सलग दुसऱ्या दिवशी त्रास सहन करावा लागत आहे. याचं कारण म्हणजे पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वे कोलमडली. बदलापूर ते अंबरनाथ या रेल्वे स्थानकादरम्यान शुक्रवारी सकाळी मालगाडीचे इंजिन अचानक फेल झाल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.
मालवाहू गाडीचं इंजिन बिघडल्याने अंबरनाथ-कर्जत रेल्वे मार्गावरील उपनगरी आणि दीर्घ पल्ल्याच्या गाड्यांवर झाला असून प्रवाशांना मोठ्या प्रमाणात विलंब सहन करावा लागत आहे. त्यामुळे लोकल सेवा देखील रखडली आहे. प्रवाशांचा मनस्ताप लक्षात घेता मध्य रेल्वेनं मोठा निर्णय घेतला असून त्याचा फायदा प्रवाशांना आणि गणपतीचं दर्शन घ्यायला येणाऱ्या भाविकांना होणार आहे.
प्रवाशांना एक्सप्रेसमधून प्रवासाची परवानगी
रेल्वे प्रशासनाने तात्पुरत्या उपाययोजनांमधून प्रवाशांना पर्यायी सोय उपलब्ध करून देण्यासाठी एक्सप्रेस गाड्यांमधून प्रवास करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे गाड्या उशिरा धावत असल्या तरी प्रवाशांना प्रवास सुलभ होईल, असा रेल्वेचा दावा आहे.
advertisement
घटनास्थळी दुरुस्तीचे प्रयत्न
मालगाडीचे इंजिन रुळांवरच थांबल्याने मागील गाड्यांचा क्रम मोडला आहे. घटनास्थळी तांत्रिक पथक पोहोचले असून इंजिन दुरुस्त करून गाडी मार्गस्थ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, परिस्थिती लवकरच सुरळीत होण्याची शक्यता आहे.
advertisement
सकाळपासून गाड्या उशिरा
सकाळपासून या मार्गावरील उपनगरी गाड्या उशिरा धावत असून कर्जत, बद्दलापूर आणि अंबरनाथसह इतर स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local update: बदलापूर-अंबरनाथ दरम्यान मालगाडीचे इंजिन फेल, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे हाल
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement