Mumbai Local: धावत्या ट्रेनमध्ये नशेखोरांचा हैदोस, मुंबई लोकलमधील खतरनाक व्हिडीओ समोर
- Published by:Prachi Amale
Last Updated:
.Mumbai Local: चालत्या ट्रेनमध्ये अशी मारहाण म्हणजे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुंबई : मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये काही तरुणांनी धावत्या लोकल ट्रेनमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. या तरुणांनी ट्रेनच्या डब्यात अक्षरशः फ्रीस्टाइल हाणामारी केली. लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत त्यांनी गोंधळ घातला. या अचानक सुरू झालेल्या भांडणामुळे प्रवासी घाबरून गेले. अनेकांनी आपापली जागा सोडून कोणी दरवाज्याजवळ तर कोणी कोपऱ्यात आसरा घेतला.
लोकमधील मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून यात तरुण एकमेकांवर तुटून पडताना दिसत आहेत. चालत्या ट्रेनमध्ये अशी मारहाण म्हणजे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. लोकलमध्ये होणाऱ्या धक्काबुक्की आणि गोंधळामुळे इतर प्रवाशांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असतो. व्हायरल होणारा व्हिडीओ कुठल्या मार्गावरील लोकल ट्रेनचा आहे, तसेच नेमका कधीचा आहे, याबाबत मात्र अद्याप अस्पष्टता आहे. मात्र, अशा प्रकारच्या वारंवार घडणाऱ्या घटना पाहता रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
advertisement
दररोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करतात. मुंबईकरांसाठी ही मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते. मात्र अशा घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. यापूर्वीही नशेत असलेले प्रवासी आणि टवाळखोर तरुण ट्रेनमध्ये प्रवाशांना त्रास देत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
कठोर कारवाई करण्याची मागणी
advertisement
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. "धावत्या ट्रेनमध्ये असे प्रकार झाले तर कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो, मग रेल्वे प्रशासन काय करते?" असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. रेल्वे प्रशासन आणि RPF ने या प्रकरणाचा गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 26, 2025 9:09 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: धावत्या ट्रेनमध्ये नशेखोरांचा हैदोस, मुंबई लोकलमधील खतरनाक व्हिडीओ समोर