''मेरे प्यारे देशवासियों...'' अंतराळात पोहोचताच शुभांशु शुक्लाचा पहिला मेसेज, पाहा VIDEO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
शुभांशु शुक्ला यांनी 41 वर्षांनंतर भारताचे प्रतिनिधित्व करत Axiom-4 मिशनसाठी अंतराळात यशस्वी झेप घेतली. त्यांनी भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात असल्याचे सांगितले.
भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. 41 वर्षांनंतर पहिल्यांदाज भारताचे सुपुत्र, शुभांशु शुक्ला यांनी आणखी तीन आंतरराष्ट्रीय अंतराळवीरांसोबत अमेरिकेतील फ्लोरिडा येथील नासाच्या कॅनेडी स्पेस सेंटरमधून Axiom-4 मिशनसाठी यशस्वीरीत्या अंतराळात झेप घेतली. विशेष म्हणजे, या महत्त्वाच्या मिशनचे नेतृत्व खुद्द शुभांशु शुक्लाच करत आहेत.
शुभांशु शुक्ला यांनी अंतराळात पोहोचताच आपल्या भारतवासीयांना भावनिक आणि प्रेरणादायी संदेश पाठवला आहे, ज्यामुळे प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंच झाली आहे. शुक्ला म्हणाले, "नमस्कार, माझ्या प्रिय देशवासीयांनो! आपण 41 वर्षांनंतर पुन्हा एकदा अंतराळात जात आहोत. हा एक अद्भुत प्रवास आहे. आपण प्रति सेकंद ७.५ किलोमीटर वेगाने पृथ्वीची परिक्रमा करत आहोत.
advertisement
आपल्या खांद्यावर अभिमानाने लावलेल्या तिरंग्याकडे निर्देश करत शुभांशु म्हणाले, "माझ्या खांद्यावर माझा तिरंगा आहे आणि तो मला सांगतो की मी तुमच्या सर्वांसोबत आहे. हा माझा प्रवास आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची (ISS) फक्त सुरुवात नाही, तर हे भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाची (Human Space Program) खरी सुरुवात आहे."
advertisement
हे मिशन क्रू कंपनीच्या 'फाल्कन 9' रॉकेटच्या साहाय्याने सुरू झाले असून, सर्व अंतराळवीर एका नवीन 'स्पेसएक्स ड्रॅगन' (SpaceX Dragon) स्पेसक्राफ्टमध्ये बसून अंतराळात पोहोचले आहेत. शुभांशुंच्या या अफाट यशाबद्दल त्यांच्या कुटुंबात प्रचंड आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, "शुभांशुमुळे आज आमची छाती अभिमानाने भरून आली आहे".
advertisement
अॅक्सिओमने यापूर्वी तीन मोहिमांद्वारे वेगवेगळ्या देशांतील प्रवाशांना अंतराळात पाठवलं आहे. यामध्ये इस्रायलचे पहिले अंतराळवीर आणि सौदी अरेबियाचे अंतराळवीर यांचा समावेश आहे. याशिवाय, या कंपनीने युरोपियन युनियन (EU) आणि अमेरिकन एजन्सी NASA सोबत अनेक आंतरराष्ट्रीय मोहिमा पार पाडल्या आहेत. अॅक्सिओम-4 मिशन हे अॅक्सिओम कंपनीचं चौथं मानवी अभियान आहे. जे नासा आणि स्पेसएक्सच्या मदतीने पार पाडलं जात आहे.
advertisement
अंतराळवीर त्यांच्या उद्दिष्टांनुसार आयएसएसवर 60 हून अधिक प्रयोग करतील. या प्रयोगांद्वारे मानवी शरीरावर अवकाश वातावरणाचा, अवकाशात शेतीचा आणि भौतिक विज्ञानाचा होणारा परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. अॅक्सिओम मिशन या अर्थाने देखील महत्त्वाचं आहे की ते सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांमधील सहकार्य यशस्वीरित्या प्रदर्शित करू शकतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 25, 2025 2:33 PM IST
मराठी बातम्या/देश/
''मेरे प्यारे देशवासियों...'' अंतराळात पोहोचताच शुभांशु शुक्लाचा पहिला मेसेज, पाहा VIDEO