Black Pepper Benefits: मूर्ती लहान, कीर्ती महान! छोट्याशा काळीमिरीचे जबरदस्त फायदे

Last Updated:
आपल्या किचनमधले सर्वच मसाले औषधी गुणांनी परिपूर्ण असतात. त्यामुळे अन्नपदार्थांमधून ते शरिरात गेल्यानं आरोग्य सुदृढ राहतं. काळीमिरी कितीही तिखट असली तरी तिच्या समावेशामुळे अन्नपदार्थांमध्ये एक चमचमीत ठसका येतो आणि त्याहून जास्त शरिराला पौष्टिक तत्त्व मिळतात. (लखेश्वर यादव, प्रतिनिधी / जांजगीर चांपा)
1/5
दिसायला अगदी लहानशी दिसणारी काळीमिरी आरोग्यासाठी बहुगुणी असते. विशेषतः खोकल्यावर काळीमिरी रामबाण ठरते. शिवाय दररोज सकाळी उपाशीपोटी काळीमिरी खाल्ल्यास शरिराची रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते.
दिसायला अगदी लहानशी दिसणारी काळीमिरी आरोग्यासाठी बहुगुणी असते. विशेषतः खोकल्यावर काळीमिरी रामबाण ठरते. शिवाय दररोज सकाळी उपाशीपोटी काळीमिरी खाल्ल्यास शरिराची रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते.
advertisement
2/5
छत्तीसगडच्या जांजगीर-चांपा जिल्हा रुग्णालयाचे आयुर्वेदिक डॉक्टर फणींद्र भूषण दिवाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्दी, ताप आणि खोकल्यासह अन्नपचन शक्तीवर काळीमिरी उपयुक्त असते. तसंच यकृताचं कार्य सुरळीत होऊन वेळेवर भूक लागण्यासही काळीमिरीमुळे मदत होते. त्याचबरोबर अन्नपचन व्यवस्थित होतं.

3/5
घसा खवखवत असेल तर काळीमिरी, सुंठ आणि लवंग एकत्र करून सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. त्याचबरोबर काळीमिरीचा वापर विविध औषधांमध्येही करतात. विशेषतः पोटाच्या विकारांवर ही औषधं गुणकारी असतात. त्याचबरोबर प्रसूतीनंतरही आहारात काळीमिरीचा समावेश केला जातो. ज्यामुळे गर्भाशयाचं आरोग्य सुरळीत राहतं.

4/5
 परंतु लक्षात घ्या, काळीमिरी  खाल्ल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो, पोटात जळजळ होऊ शकते. म्हणून काळीमिरीचं सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावं.
परंतु लक्षात घ्या, काळीमिरी जास्त प्रमाणात खाल्ल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो, पोटात जळजळ होऊ शकते. म्हणून काळीमिरीचं सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावं.
advertisement
5/5
 सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या  कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः  घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्यासंबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement