Weight Loss Tips : हार्ड वर्कआऊटची गरज नाही; फक्त घरातली ही कामं करा, सहज कमी होईल वजन

Last Updated:
वाढलेले वजन हे अनेक आजारांचे कारण ठरू शकते. त्यामुळेच ज्या लोकांचे वजन खूप जास्त आहे, ते लोक वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. तर काही लोकांना त्यांचे वजन नियंत्रित ठेवायचे असते. म्हणून ते पर्यटन करतात. पण प्रत्येकवेळी तुम्हाला खूप हार्ड वर्कआऊट करण्याची गरज नाही. घरातील काही कामं करूनही तुम्ही फॅट बर्न करू शकता. चला पाहुयात ती कामं कोणतं आहेत आणि त्यांचा कसा फायदा होतो.
1/8
 स्वयंपाक करा : स्वयंपाक केल्याने  होण्यास मदत होते. अर्धा तास स्वयंपाक केल्याने 92 कॅलरीज बर्न होऊ शकतात. तुम्ही दिवसातून किती वेळा स्वयंपाक करता यानुसार संख्या वाढते.
स्वयंपाक करा : स्वयंपाक केल्याने कॅलरी बर्न होण्यास मदत होते. अर्धा तास स्वयंपाक केल्याने 92 कॅलरीज बर्न होऊ शकतात. तुम्ही दिवसातून किती वेळा स्वयंपाक करता यानुसार संख्या वाढते.
advertisement
2/8
फरशी पुसा : वेबएमडीच्या रिपोर्टनुससार, संपूर्ण घराची साफसफाई वॅक्यूम क्लिनरने केल्यास अर्ध्या तासात जवळपास ९९ कॅलरीज बर्न होतात. जेव्हा हाताने फरशी पुसली जाते तेव्हा संपूर्ण मसल्स रिलॅक्स होण्यास मदत होते.

3/8
कपडे धुवा : रोज 30 मिनिटे कपडे धुतल्यास 133 कॅलरीज बर्न होण्यास मदत होतात. जर तुम्ही कपडे हाताने धुतले तर ही संख्या आणखी जास्त वाढते.
कपडे धुवा : रोज 30 मिनिटे कपडे धुतल्यास 133 कॅलरीज बर्न होण्यास मदत होतात. जर तुम्ही कपडे हाताने धुतले तर ही संख्या आणखी जास्त वाढते.
advertisement
4/8
 पाळीव प्राण्याला फिरायला घेऊन जा : तुमच्याकडे कुत्रा असेल तर त्याला रोज बाहेर फिरायला घेऊन जा. या निमित्ताने तुम्ही अर्धा तास चालाल आणि जवळपास 149  करण्यात तुम्हाला मदत मिळेल.
पाळीव प्राण्याला फिरायला घेऊन जा : तुमच्याकडे कुत्रा असेल तर त्याला रोज बाहेर फिरायला घेऊन जा. या निमित्ताने तुम्ही अर्धा तास चालाल आणि जवळपास 149 कॅलरीज बर्न करण्यात तुम्हाला मदत मिळेल.
advertisement
5/8
बागकाम करा : बागकाम म्हणजेच गार्डेनिन्ग हीदेखील वजन कमी करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी एक उत्तम क्रिया आहे. याद्वारे अर्ध्या तासात 167 कॅलरीज बर्न करण्यास मदत होते.
बागकाम करा : बागकाम म्हणजेच गार्डेनिन्ग हीदेखील वजन कमी करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी एक उत्तम क्रिया आहे. याद्वारे अर्ध्या तासात 167 कॅलरीज बर्न करण्यास मदत होते.
advertisement
6/8
गाडी धुवा : तुमच्या कडे बाईक किंवा कार असेल तर ती नियमित धुवा. कार धुतल्याने देखील तुम्हाला अर्ध्या तासात 167 कॅलरीज बर्न करता येतात.
गाडी धुवा : तुमच्या कडे बाईक किंवा कार असेल तर ती नियमित धुवा. कार धुतल्याने देखील तुम्हाला अर्ध्या तासात 167 कॅलरीज बर्न करता येतात.
advertisement
7/8
मुलांसोबत खेळणे : मुलांसोबत घरातच वेळ घालवण्यापेक्षा त्यांच्यासोबत वेगवेगळे मैदानी खेळ खेळा. यामध्ये तुम्ही 149 ते 186 कॅलरीज बर्न करू शकता.
मुलांसोबत खेळणे : मुलांसोबत घरातच वेळ घालवण्यापेक्षा त्यांच्यासोबत वेगवेगळे मैदानी खेळ खेळा. यामध्ये तुम्ही 149 ते 186 कॅलरीज बर्न करू शकता.
advertisement
8/8
भांडी घासा, बेडवरची चादर बदला : साबण आणि पाण्याने भांडी डिप क्लिन करताना तुम्ही 135 ते 200 कॅलरीज कमी करू शकता. त्याचबरोबर बेडवरचे बेडशीट बदलताना तुम्ही 180 ते 300 कॅलरीज बर्न करू शकता.
भांडी घासा, बेडवरची चादर बदला : साबण आणि पाण्याने भांडी डिप क्लिन करताना तुम्ही 135 ते 200 कॅलरीज कमी करू शकता. त्याचबरोबर बेडवरचे बेडशीट बदलताना तुम्ही 180 ते 300 कॅलरीज बर्न करू शकता.
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement