नवरा-बायकोतलं प्रेम वाढतं, लक्ष्मी-नारायणाचा आशीर्वाद मिळतो! जन्माष्टमीला करावा 1 उपाय
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Krishna Janmashtami: येत्या 26 ऑगस्टला सर्वत्र कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी होईल. कृष्ण म्हणजे प्रेम आणि तुळस म्हणजे देवी लक्ष्मीचं रूप. त्यामुळे आयुष्यात प्रेम आणि धनसंपत्तीची भरभराट व्हावी यासाठी कृष्ण जन्माष्टमीला काही खास उपाय करण्याचा सल्ला दिला जातो. उज्जैनचे ज्योतिषी पंडित आनंद भारद्वाज यांनी याबाबत माहिती दिली आहे. (शुभम मरमट, प्रतिनिधी / उज्जैन)
advertisement
जन्माष्टमीच्या पूजेत श्रीकृष्णाला दह्याचा नैवेद्य आवर्जून अर्पण करावा. या नैवेद्यात तुळशीची पानं घालावी. यामुळे आर्थिक भरभराट होते असं म्हणतात.
advertisement
खूप प्रयत्न करूनही नोकरी, व्यवसायात यश मिळत नसेल, तर जन्माष्टमीला तुळशी मातेला लाल रंगाच्या चुनरीचा शृंगार करावा. असं करताना कृष्णाला मनातली इच्छा सांगावी. कृष्ण आणि तुळशी मातेच्या आशीर्वादानं ही इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते.
advertisement
जन्माष्टमीला घरात तुळशीच्या रोपाची लागवड केल्यास वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात. संसारात जणू नव्यानं सुख येतं. तसंच अविवाहितांना लग्नासाठी एक उत्तम स्थळ येऊ शकतं.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.