Shani चक्क रुसतो! आपली 'ही' 1 चूक पडते महागात, राजाचा क्षणात रंक होतो
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आपल्या घरावर कोणतंही संकट येऊ नये, घरातला प्रत्येक सदस्य निरोगी आणि यशस्वी राहावा यासाठी आपण दररोज सकाळी, संध्याकाळी देवासमोर हात जोडतो. त्याच्याकडे सर्वांच्या भल्यासाठी प्रार्थना करतो. परंतु खरंच एवढं पुरेसं असतं का? वास्तूशास्त्र सांगतं नाही. (कैलाश कुमार, प्रतिनिधी / बोकारो)
आपलं आणि आपल्या माणसांचं भलं हे आपल्या कर्मांवर अवलंबून असतं हे खरंय. परंतु घरातील दिशा आणि वस्तूंची मांडणीदेखील आपलं सुख ठरवत असतात. घरात कायम सुख, समृद्धी कशी नांदेल, घरातल्या सदस्यांची वैयक्तिक आयुष्यात भरभराट कशी होईल यासाठी ज्योतिषशास्त्रात काही नियम दिलेले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अनेकजणांना चप्पल घालूनच स्वयंपाक करण्याचीही सवय असते. काहीजणांना जमिनीचा गारवा सहन होत नाही. आरोग्याबाबत कारणांसाठी ते चप्पलेचा वापर करतात, तर अनेकजण सवयीमुळे घरभर चप्पल वापतात. परंतु वास्तूशास्त्रानुसार हे चूक आहे.
advertisement
चप्पल घालून स्वयंपाक केल्यास घरात वास्तूदोष निर्माण होतो. सर्वात नकारात्मक परिणाम हा आपल्या आर्थिक परिस्थितीवर होतो. कधीच वाट्याला न आलेली आर्थिक चणचण या सवयीमुळे आपल्याला अनुभवायला मिळू शकते. त्यामुळे काळजी घ्यावी.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)