Vastu Tips: घरात आरसा कोणत्या दिशेला असावा? सुख-समृद्धीसाठी हा वास्तु नियम लाखमोलाचा
- Published by:Ramesh Patil
- trending desk
Last Updated:
Vastu Tips Marathi: योग्य दिशेला आरसा लावला, तसंच तो सुस्थित असला तर घरात लक्ष्मीमातेचं आगमन होतं आणि सुख-समृद्धी नांदते. त्यामुळे घरात नेमक्या कोणत्या दिशेला आरसा असावा?
मुंबई : नवीन घर बांधल्यावर किंवा फ्लॅट खरेदी केल्यावर आपण त्याच्या सजावटीसाठी मोठा खर्च करतो. घर सुंदर दिसावं, घरात प्रसन्न वाटावं, तसंच सुख-समृद्धी नांदावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करतो; पण काही वेळा सर्व गोष्टी करूनही घरात सुख-समृद्धी नांदत नाही. वास्तुशास्त्रात यासाठी काही उपाय सांगितले आहेत. प्रत्येक घरात आरसा असतोच. वास्तुशास्त्रानुसार हा आरसा धनलाभाचं साधन ठरू शकतो. योग्य दिशेला आरसा लावला, तसंच तो सुस्थित असला तर घरात लक्ष्मीमातेचं आगमन होतं आणि सुख-समृद्धी नांदते. त्यामुळे घरात नेमक्या कोणत्या दिशेला आरसा असावा, तसंच कोणत्या उपायांमुळे घरात सुख-समृद्धी नांदते, ते जाणून घेऊ या.
वास्तूचा थेट परिणाम त्या वास्तूत राहणाऱ्यांवर होत असतो. हीच गोष्ट ऑफिस, व्यवसाय किंवा कामाच्या ठिकाणीदेखील लागू होते. या जागी चांगलं वातावरण, सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी सकाळी थोडा वेळ शंखनाद करावा. यामुळे या ठिकाणी असलेली नकारात्मक ऊर्जा बाहेर पडून सकारात्मक ऊर्जा आत येते. तुमच्या घरात गंगाजल असेल तर ते ईशान्य कोपऱ्यातल्या देवघरात ठेवावं. हे जल प्लास्टिकच्या बाटलीत कदापि ठेवू नये. यासाठी काचेच्या बाटलीचा किंवा भांड्याचा वापर करावा. पूजा झाल्यावर घराच्या प्रवेशद्वारापासून ते किचनपर्यंत सर्व ठिकाणी गंगाजल शिंपडावं. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते.
advertisement
प्रत्येक घरात आरसा असतो. बऱ्याचदा या आरशावर धूळ साचते; पण ती लवकर लक्षात येत नाही. आरशावर धूळ साचण्याचा अर्थ समृद्धीवर धूळ साचणं होय. त्यामुळे घरातले आरसे रोज स्वच्छ करावेत. त्यामुळे घरात समृद्धी येते. घराच्या दक्षिण कोपऱ्यात आरसा लावला तर धनहानी होऊ शकते. त्यामुळे आरसा उत्तर आणि पूर्व दिशेच्या कोपऱ्यात म्हणजेच ईशान्येला लावावा. चिकटवता येणारा किंवा तुटलेला आरसा घरात ठेवू नये. आरसा फुटणं, तुटणं हे धनहानीचे संकेत असतात. त्यामुळे घरात आरसा लावताना पुरेशी दक्षता घ्यावी.
advertisement
घरात क्रॉस व्हेंटिलेशनसाठी छोट्या खिडक्या किंवा स्कायलाइट्स असतात. त्या नियमित स्वच्छ करणं गरजेचं आहे. या खिडक्या किंवा स्कायलाइट्सवर धूळ साचल्यास घरात समृद्धी येत नाही. कोळ्याचं जाळं हे दारिद्र्याचं लक्षण असतं. त्यामुळे आर्थिक समस्या निर्माण होतात. या समस्या टाळण्यासाठी खिडक्या किंवा स्कायलाइट्स नियमित स्वच्छ कराव्यात, असं वास्तुशास्त्राचे जाणकार सांगतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 18, 2024 10:29 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vastu Tips: घरात आरसा कोणत्या दिशेला असावा? सुख-समृद्धीसाठी हा वास्तु नियम लाखमोलाचा