Vastu Tips: क्षुल्लक चुका आनंद हिरावतात! जिथं ठेवू नये तिथंच तुम्ही तुळस ठेवता?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
वास्तूशास्त्र सांगतं, सुख-समृद्धी नांदावी यासाठी प्रत्येक घरात तुळशीचं रोप असणं आवश्यक आहे. ज्या घरात तुळस तिथं लक्ष्मीचा वास, हे समीकरण वर्षानुवर्षांचं आहे. आपण अनेकदा त्याचा अनुभवही घेतला असेल. परंतु घरात तुळशीचं रोप असायला हवं म्हणजे ते कुठेही ठेवायचं असा अर्थ होत नाही, घरात 5 अशा जागा असतात जिथं हे रोप असेल, तर होत्याच नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. मध्यप्रदेश राज्यातील उज्जैनचे ज्योतिषी पंडित रवी शुक्ला यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. (शुभम मरमट, प्रतिनिधी / उज्जैन)
advertisement
advertisement
तुळशीच्या रोपामुळे शुभ फलप्राप्ती होते यात काहीच शंका नाही. परंतु घरातल्या अशा कोपऱ्यात चुकूनही या रोपाची लागवड करू नये जिथं सूर्यकिरणं पोहोचणार नाहीत. असं केल्यास आपण स्वतः स्वतःवर आर्थिक अडचणी ओढवाल.
advertisement
वास्तूशास्त्रात असे अनेक नियम दिलेले आहेत, ज्यामुळे घरातलं वातावरण कायम आनंदी राहू शकतं. त्यानुसार, तुळशीला लक्ष्मी देवीचं रूप मानलं जातं. त्यामुळे हे रोप चुकूनही तळघरात आणि घराच्या गच्चीवर ठेवू नये. असं केल्यास घरातली सगळी सकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)