Mahashivratri 2025: भोलेनाथाचा रुद्रावतार सोसावा लागेल! महाशिवरात्रीच्या पूजेत बिलकूल करू नये या चुका

Last Updated:

Mahashivratri 2025: महाशिवरात्री हिंदू धार्मिक लोक मोठ्या उत्साहात साजरी करतात. शिव मंदिरे भाविकांनी गजबजून जातात. महाशिवरात्रीच्या दिवशी शिव-पार्वतीचा विवाह झाल्याचे मानले जाते. महादेवाची पूजा केल्यानं

News18
News18
मुंबई : मराठी माघ महिन्यातील सर्वात मोठा सण हा महाशिवरात्रीचा असतो. महाशिवरात्री हिंदू धार्मिक लोक मोठ्या उत्साहात साजरी करतात. शिव मंदिरे भाविकांनी गजबजून जातात. महाशिवरात्रीच्या दिवशी शिव-पार्वतीचा विवाह झाल्याचे मानले जाते. महादेवाची पूजा केल्यानं जीवनातील संकटांमध्ये वाट सापडते. यावेळी 26 फेब्रुवारीला देशभरात शिवरात्रीचा मोठा उत्सव साजरा होणार आहे. महाशिवरात्रीला घरी किंवा मंदिरामध्ये शिव-पार्वतीची पूजा करताना काही गोष्टींची खबरदारी घ्यावी. शिवलिंगावर काही गोष्टी कधीही अर्पण केल्या जात नाहीत. याबद्द्ल अधिक जाणून घेऊ.
शिवलिंगावर कुंकू अर्पण करू नये - शंकराच्या पूजेच्या वेळी शिवलिंगावर बेलपत्र, भांग, धतुरा, फळझाड इत्यादी साहित्य अर्पण केले जाते. पण कुंकू कधीच अर्पण केले जात नाही. हिंदू धर्मात स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुंकू लावतात, पण भगवान शिवाचे एक रूप विनाशक असल्याचे मानले जाते. त्यांच्या विनाशकारी स्वभावामुळे शिवलिंगावर कुंकू अर्पण करणे निषिद्ध मानले जाते.
advertisement
शिवलिंगावर हळद अर्पण करू नये - हिंदू धर्मात हळद अत्यंत शुद्ध आणि पवित्र मानली जात असली तरी तिचा उपयोग शिवपूजेत केला जात नाही. शास्त्रानुसार शिवलिंग हे पुरुष तत्त्वाचे प्रतीक असून हळदीचा संबंध स्त्रियांशी आहे. यामुळेच भोलेनाथाला हळद अर्पण केली जात नाही. केवळ महाशिवरात्रीलाच नाही, तर इतर कोणत्याही प्रसंगी शंकराला किंवा शिवलिंगाला हळद वाहण्याची चूक करू नये.
advertisement
शिवलिंगावर तुळस अर्पण करू नये - तुळशीचा जन्म मागील जन्मी राक्षस कुळात झाला होता. तिचे नाव वृंदा होते, ती श्री हरी विष्णूची परम भक्त होती. वृंदाचा विवाह राक्षस राजा जालंधरशी झाला होता. पत्नीच्या भक्तीमुळे आणि विष्णूकवचामुळे जालंधरला अमरत्वाचे वरदान लाभले. एकदा जालंधर देवतांशी लढत असताना वृंदा पूजेला बसली आणि पतीच्या विजयासाठी विधी करू लागली. भक्तीच्या प्रभावामुळे जालंधर हरत नव्हता. तेव्हा भगवान शिवाने त्याचा वध केला. वृंदाला आपल्या पतीच्या निधनाने खूप दुःख झाले आणि तिने रागाने महादेवाला शाप दिला की, तुळशीची पाने आपल्या पूजेत कधीही वापरली जाणार नाहीत.
advertisement
शिवलिंगाला शंखाने जल अर्पण करू नये - शिवलिंगावर कधीही शंख घेऊन जल अर्पण करू नये. प्रत्येक देवतेच्या पूजेत शंख वापरला जातो. पण महादेवाच्या पूजेत कधीच वापरला जात नाही. शिवपुराणानुसार, शंखचूड एक पराक्रमी राक्षस होता, ज्याचा वध स्वतः भगवान शिवाने केला होता. म्हणूनच महाशिवरात्रीला शिवलिंगाला कधीही शंखातून जल अर्पण केले जात नाही, आपणही ती चूक करू नये.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
Mahashivratri 2025: भोलेनाथाचा रुद्रावतार सोसावा लागेल! महाशिवरात्रीच्या पूजेत बिलकूल करू नये या चुका
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement