Video : प्रेमात घसरला पाय! गर्लफ्रेंडला धबधब्यावर प्रपोज आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Boyfriend fell in waterfall while propose girlfriend : तरुण तरुणीला प्रपोज करताना एखादं खास ठिकाण शोधतात. या तरुणाने असं ठिकाण शोधलं ज्याचा कुणी स्वप्नातही विचार केला नसेल, ते म्हणजे धबधबा आणि तिथं नको तेच घडलं.
नवी दिल्ली : आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी लोक काय काय नाही करत. विशेषत: तरुण एखाद्या तरुणीच्या प्रेमात पडतात तेव्हा तिला इम्प्रेस करण्यासाठी काहीही करतात. प्रपोज करण्यासाठी एकापेक्षा एक भन्नाट आयडिया शोधतात. असाच एक तरुण ज्याने त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी असं काही केलं ते त्याच्या अंगाशी आलं.
प्रपोज करताना ठिकाण आणि वेळही महत्त्वाची असते. आपण कधी आणि कुठे प्रपोज करतो, यावरही समोरच्याचा होकार, नकार, उत्तर अवलंबून असतं. त्यामुळे तरुण तरुणीला प्रपोज करताना एखादं खास ठिकाण शोधतात. या तरुणाने असं ठिकाण शोधलं ज्याचा कुणी स्वप्नातही विचार केला नसेल, ते म्हणजे धबधबा.
advertisement
धब्याधब्याच्या आत उभं राहून या तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. पण म्हणतात ना प्रेमात पाय घसरतो, तसंच या तरुणासोबत घडलं. त्याने गर्लफ्रेंडला प्रपोज करतातच पाण्यात त्याचा पाय घसरला आणि तो धबधब्यात वाहून गेला.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक तरुण आणि तरुण दोघं धबधब्याच्या पाण्यात उभे आहेत. तरुणी पाठमोरी आहे. तरुण तिच्या खांद्यावर हात ठेवून तिचं लक्ष आपल्याकडे वेधतो आणि तो गुडघ्यावर बसून अंगठी देऊन प्रपोज करतो. पण गर्लफ्रेंडचं उत्तर मिळण्याआधीच त्याचा पाय घसरतो आणि तो धबधब्याच्या पाण्यात वाहत जातो.
advertisement
A dude pops the question to his girl in a crazy dangerous spot...🥺 💔 pic.twitter.com/Gzdxfza5hD
— March (@MarchUnofficial) July 4, 2025
व्हिडीओ पाहून सगळ्यांना धक्का बसला आहे. अनेकांनी हा तरुण जिवंत आहे की नाही असं विचारलं आहे. व्हिडीओ तुम्ही पाहाल तर त्यावर माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदी दिवस, असं कॅप्शन आहे. तसंच एका युझरने ग्रोकवर हा प्रश्न उपस्थत केला तेव्हा ग्रोकनेही हा तरुण जिवंत असल्याचं सांगितलं आहे. तसंच या व्हिडीबाबत सविस्तर माहितीही दिली आहे.
advertisement
ग्रोकने दिलेल्या माहितीनुसार हे दृश्य जेमिकामध्ये डुन्स रिव्हरफॉल येथील आहे. जिथं अनेक जण घसरतात पण ते क्वचितच जीवघेणं ठरतं. या व्हिडीओतील व्यक्तीच नाव जेमी आहे. या व्यक्तीला वाचवण्यात आलं आहे, त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
advertisement
दरम्यान न्यूज18मराठीने या माहितीची पुष्टी केलेली नाही. @MarchUnofficial या एक्स अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट आल्या आहेत. काही युझर्सनी याला कलयुगी मोहब्बत म्हटलं आहे. तर काहींनी हे साहस नव्हे मूर्खपणा होता, जीवाची किंमत लावून प्रपोज करण्यात अर्थ काय, प्रेम माणसाला धोकादायक ठिकाणी नेते, अशा ठिकाणी सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं आहे, अशा कमेंट केल्या आहेत. तर काही युझर्सनी गर्लफ्रेंडने त्याला वाचवण्याचा प्रयत्न न करण्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
Location :
Delhi
First Published :
July 08, 2025 10:20 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Video : प्रेमात घसरला पाय! गर्लफ्रेंडला धबधब्यावर प्रपोज आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं