Shravan 2025: श्रावणातील एखाद्या सोमवारी उपवास मोडला तर..? शास्त्रात काय सांगितलेत उपाय पहा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shravan 2025: श्रावण सोमवारचे व्रत चुकून खंडित झाले तर घाबरण्याची किंवा पश्चात्ताप करण्याची गरज नाही. भोलेनाथ नावाप्रमाणेच दयाळू-कृपाळू आहेत आणि खऱ्या भक्तिभावानं केलेल्या प्रार्थना निश्चितच स्वीकारतात. पण, पुढच्या सोमवारी...
मुंबई : श्रावण सोमवारी उपवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. व्रत-उपवास म्हणजे शारीरिक संयम, मानसिक स्थिरता आणि आध्यात्मिक साधना यांचे सामूहिक स्वरूप असं मानलं जातं. श्रावण सोमवारचं व्रत भगवान शंकराला समर्पित आहे. श्रावण सोमवारी भाविक उपवास, पूजा, जप आणि भक्तीनं शंकराला प्रसन्न करतात. श्रावणी सोमवारचं व्रत चुकून मोडलं गेलं तर श्रद्धावान लोकांच्या ते मनाला लागतं. महादेव क्रोधित होतील, अशी भीती वाटते. चुकून व्रत-उपवास मोडला गेल्यास (खंडित) शास्त्र आणि पुराणांमध्ये काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. श्रावण सोमवार व्रत अत्यंत पुण्यपूर्ण मानले जाते. परंतु जर ते चुकून खंडित झाल्यास काय करावे याबाबत जाणून घेऊ.
श्रावण सोमवारचे व्रत मोडल्यास काय करावं?
श्रावण सोमवारचे व्रत चुकून मोडल्यास (खंडित) झाले तर घाबरण्याची किंवा पश्चात्ताप करण्याची गरज नाही. भोलेनाथ नावाप्रमाणेच दयाळू-कृपाळू आहेत आणि खऱ्या भक्तिभावानं केलेल्या प्रार्थना निश्चितच स्वीकारतात. पण, पुढच्या सोमवारी चांगली काळजी घ्यावी, तपश्चर्या आणि अधिक जागरूकपणे उपवास करावा. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून जाणून घेऊया, श्रावण सोमवारचा उपवास मोडल्यास शास्त्रांमध्ये काय उपाय सांगितले आहेत.
advertisement
महादेवाची क्षमा मागा -
शास्त्रात असं सांगितलंय की, जर आपल्याकडून नकळत उपवास मोडला गेला तर सर्वप्रथम त्या चुकीबद्दल देवाची क्षमा मागावी. त्यासाठी महादेवाला नमस्कार करून मनात “हे भोलेनाथ, मी नकळत उपवासाचा नियम मोडला. कृपया माझी चूक झालीय, पण मला क्षमा करा, तुमचे आशीर्वाद निरंतर राहु देत.” असे म्हणावे. मनातील खऱ्या भावनेने अशा प्रकारे क्षमा मागितल्याने भगवान शिव चूक माफ करून प्रसन्न होतात, कारण ते "आशुतोष" आहेत - म्हणजे थोड्या प्रयत्नाने प्रसन्न होणारे.
advertisement
पुढील सोमवारी काय करावं -
एखाद्या श्रावणी सोमवाली उपवास मोडल्यास, पुढील सोमवारी पुन्हा उपवास करणे आणि विशेष पूजा करणे. याला "प्रयाश्चित व्रत" मानले जाते. या दिवशी योग्य विधींनी उपवास करून, शिवलिंगावर पाण्याने अभिषेक करून आणि "ओम नम: शिवाय" जप केल्याने शुभफळ मिळते.
महामृत्युंजय मंत्र किंवा रुद्राभिषेक पठण करा -
शिवपुराणानुसार, जर उपवास चुकून मोडला तर "महामृत्युंजय मंत्र" जप करणे विशेषतः फायदेशीर आहे:
advertisement
मंत्र: "ओम त्र्यंबकम यजमहे सुगंधिम पुष्टीवर्धनम्।
उर्वरुकमिव बंधनन मृत्युो मुक्षिया मामृतात् ॥"
याशिवाय, रुद्राभिषेक करणे देखील पुण्यपूर्ण मानले जाते. दूध, पाणी, मध, बेलपत्र इत्यादींनी शिवलिंगाचा अभिषेक करा.
भावनिक दृढनिश्चय असावा -
उपवासाचा मुख्य उद्देश केवळ शारीरिक उपवासच नाही तर आध्यात्मिक शुद्धीकरण आणि देवाशी एकरुप होणे असाही आहे. तुम्ही अनावधानाने काही खाल्ले किंवा उपवासाचा नियम मोडला, परंतु मनात भक्ती कायम राहिली, तर तो उपवास अपूर्ण मानला जात नाही. अनावधानानं श्रावण सोमवारचा उपवास मोडल्यावर अन्नदान, गोसेवा, ब्राह्मणांना भिक्षा, कपडे दान करणे किंवा अन्नदान यासारख्या गोष्टी करणं देखील पुण्यपूर्ण मानले जाते. यामुळे मानसिक शांती देखील मिळते आणि उपवासाची अपूर्णता दूर होते.
advertisement
ते उपवास व्रत असं पूर्ण करा -
श्रावणातील एखाद्या सोमवारी उपवास मोडला तर श्रावणातील शेवटच्या सोमवारी किंवा कोणत्याही विशेष सोमवारी उपवासाचे उद्यापन करू शकता. यामध्ये शिव-पार्वतीची पूजा करणे, मुलींना अन्न, दक्षिणा आणि कपडे देणे शुभ मानले जाते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 15, 2025 11:25 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shravan 2025: श्रावणातील एखाद्या सोमवारी उपवास मोडला तर..? शास्त्रात काय सांगितलेत उपाय पहा