मराठी अभिनेत्रीचं मुस्लिम मुलावर जडलं प्रेम, लग्नासाठी धर्मही बदलला; फिल्मी वाटावी अशी समरच्या आजीची LOVE STORY
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sulbha Arya Love Story : वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेतील आजी म्हणजेच अभिनेत्री सुलभा आर्या यांनी एका मुस्लिम मुलाशी लग्न केलं होतं. त्या काळात त्यांनी हा अत्यंत धाडसी निर्णय घेतला होता.
मुंबई : फिल्म इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी धर्माची भींत ओलांडून लग्न केलं. अमृता सिंह, सैफ अली खान, शाहरुख खान गौरी, जेनिलिया-रिकेश, सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बाल अशा अनेक सेलिब्रेटी जोड्या आहेत ज्यांनी धर्मापलिकडे जाऊन लग्न केलं. फक्त हिंदी सिनेमात किंवा बॉलिवूड कलाकारांनीच नाही तर मराठी कलाकारांनाही धर्मापलिकडे जाऊन लग्न केलं आहे. वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेतील आजी म्हणजेच अभिनेत्री सुलभा आर्या यांनी एका मुस्लिम मुलाशी लग्न केलं होतं. त्या काळात त्यांनी हा अत्यंत धाडसी निर्णय घेतला होता.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सुलभा आर्या यांनी त्यांच्या आंतरधर्मीय लग्नाबद्दल सांगितलं. त्यांच्या सासूबाईंचा सपोर्ट त्यांना कसा मिळाला याबद्दलही त्या बोलल्या. सुलभा यांचं लग्नाआधीचं नाव सुलभा गुप्ते असं होतं. त्यांचं लग्न प्रसिद्ध दिवंगत सिनेमॅटोग्राफर ईशान आर्या यांच्याशी झालं. ते मुळचे एका मुस्लिम कुटुंबातील होते. ईशान यांनी सुलभा यांच्याशी लग्न करण्यासाठी धर्म बदलला होता. त्यांनी आर्य धर्म स्वीकारला. त्याकाळी इतका मोठा धाडसी निर्णय घेणं खूप कठीण होतं.
advertisement
( Smita Patil : बर्फात सुजलेलं शरीर अन् स्मिताचा शेवटचा मेकअप, आर्टिस्टने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग)
अभिनेत्री सुलभा आर्या यांनी सांगितलं, "प्रेम होतं, प्रेमाचं आणि त्यांच्या कुटुंबाचं धाडस होतं. तो आर्य समाजात कन्वर्ट झाला आणि मग आम्ही लग्न केलं. त्यासाठी कोणाचाच विरोध नव्हता. फिल्म इंडस्ट्री, हिंदू-मुस्लिम मॅरेजासाठी त्या काळातील समाज तसा नव्हता. त्याचंही असं होतं की मला लग्न करायचं आहे. बाकी तू माझ्याबरोबर रहा किंवा राहू नकोस, तुला जे करायचं ते कर. नशिबानं सगळीकडून मला खूप चांगली माणसं मिळत गेली."
advertisement
माहेर-सासरच्या मंडळींनी स्वीकारलं
त्या म्हणाल्या, "मला प्रश्न होता सासूचा. त्या नमाज वगैरे करायच्या, मी त्यांना कधी बुरखा वगैरे घातलेलं पाहिलेलं नाही. आपल्याकडे दोन्ही बाजूला कट्टर माणसं असतात, पण मला तशी माणसं नाही भेटली. माझ्या माहेरीपण पटकन एक्सेप्ट केलं. माझ्या आई-वडिलांना सगळे देवाप्रणाणे मानायचे, त्यांना का दुखवायचं. त्यामुळे जे काही झालं तर खूप वाढत नाही गेलं. तो आई-वडिलांना येऊन भेटला होता. ते त्याला भेटले, तेव्हाही घरी काहीही तमाशा नाही. आपला समाज एवढा पुढे गेलेला नाही, नाही होणार इतकंच. ड्रामे होतायत वगैरे जसं दाखवतात, तसं काहीच झालं नाही."
advertisement
advertisement
सुलभा यांना सासूचा सपोर्ट
त्यांना सांगितलं, "त्यावेळेस आमचं लग्न सगळ्यांनी स्वीकारलं. माझ्या सासरकडच्यांनी स्वीकारलं. काही नातेवाईक माझ्या सासूच्या मागे लागले होते की, ती आता आलीये तर आपण त्यांचा निकाह करुया. त्या बोलल्या असत्या तर मी केलं असतं. पण मी नाही विश्वास ठेवत तर मी नाही ठेवत. माझ्यासाठी माणसं खूप महत्त्वाची. जिथे तुमचा जन्म झाला तो तुमचा धर्म झाला. तुम्ही तुमच्या मर्जीने आलेला नाहीत. त्यांना जेव्हा कोणीतरी निकाहबद्दल सांगितलं तेव्हा त्या म्हणाल्या, नाही, झालंय त्यांचं लग्न, हा बहुला बहुलीचा खेळ नाही."
advertisement
म्हणून नवऱ्याने बदलला धर्म
अभिनेत्री सुलभा यांनी एक प्रसंग सांगितला, "एकदा मी कुठेतर जाताना त्यांच्याकडंचं लग्न होतं म्हणून मुद्दाम कुंकू लावलं नव्हतं. तिथे कोणी बघेल म्हणून. तेव्हा मला कोणीतरी विचारलं की बेटा तू टिकली नाही लावली. तेव्हा मी म्हणले की नाही लावली का? विसरले असेन. त्यावर सासू म्हणाली, नाही बेटा असं नसतं. अशी माझी सासू होती. जिच्या मुलाने त्या वेळेस आर्य धर्म स्वीकारला. तेव्हा त्याची आईही त्याला बोलली की, तू मुसलमान कधी होतास की आता आर्य बनायला जात आहेस. ते पण फक्त लग्नासाठी. तेही फक्त आमच्या कन्विनियन्टसाठी कारण मला सुट्टी मिळणार होती आणि कोर्टाच्या तारखांसाठी एक महिना थांबता येणार नव्हतं. त्यामुळे आम्हाला हे करावं लागलं."
advertisement
"तेव्हा ते मला म्हणाले होते की, तू तुझं कर. आमच्याकडे आलीस म्हणून तुझं 20 वर्षांचं विसरून जाशील. आणि असं नाही की तू आमच्याकडे आलीस म्हणून आम्ही आमचं सगळं विसरून जाऊ."
नवऱ्याच्या आठवणी सांगत सुलभा म्हणाल्या, "मी त्याला खूप मिस करते. तो माझं पहिलं प्रेम आहे आणि मी त्याच्याशी लग्न. आमचा फक्त 23 वर्षांचा संसार होता. पण तो खूप सुंदर, यशस्वी, सासर आणि माहेरच्या लोकांसोबतचा आनंदी संसार होता. तक्रार करण्यासाठी काहीच कारण नव्हतं. मला सगळं चांगलं मिळत गेलं आणि आपसूक मिळत गेलं."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 09, 2025 11:56 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
मराठी अभिनेत्रीचं मुस्लिम मुलावर जडलं प्रेम, लग्नासाठी धर्मही बदलला; फिल्मी वाटावी अशी समरच्या आजीची LOVE STORY