BMC Elections : BMC साठी ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? मनसेच्या बड्या नेत्यानं दिली महत्त्वाची अपडेट
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:PRANALI KAPASE
Last Updated:
Uddhav Thackeray Raj Thackeray : जागा वाटपाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मनसेच्या बड्या नेत्याने यावर भाष्य केले आहे.
मुंबई: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाकरे बंधूंची दुरावलेली मने एकत्र आल्याचे चित्र असून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही सकारात्मक, उत्साहाचे वातावरण असल्याचे दिसून येते. मुंबई महापालिकेसह ठाणे, पुणे, नाशिक आणि इतर महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे गट आणि मनसे यांची युती होण्याची शक्यता आहे. जागा वाटपाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मनसेच्या बड्या नेत्याने यावर भाष्य केले आहे.
काही वृत्तांनुसार, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत बंधूंच्या एकत्र येण्याने राजकीय समीकरणे बदलू शकतात. मुंबई, ठाणे आणि इतर लगतच्या महापालिकांमध्ये मराठी मते एकत्रित येण्याचा अंदाज आहे. मागील काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढल्या आहेत.
जागा वाटपाचं ठरलं?
advertisement
काही वृत्तांनुसार, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गट आणि मनसेमध्ये 50-50 टक्के जागांचे वाटप ठरले आहे. तर, इतर महापालिकांमध्ये 60-40 टक्के असे प्रमाण ठरल्याचे वृत्त समोर आले.
मनसे नेत्याने दिली अपडेट...
मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी ठाकरे गट आणि मनसेच्या युती-जागा वाटपावर भाष्य केले आहे. अविनाश अभ्यंकर यांनी सांगितले की, आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक असून पक्षाच्या आदेशावर काम करत आहोत. जागा वाटपाबाबत आम्हाला तुमच्या सूत्रांकडून कळते. ही सुत्र आहेत कोण? असा उलट सवाल करत त्यांनीअशी कोणतीही माहिती आम्हाला नसून आम्ही आमचं काम करत आहोत, बैठका सुरू असल्याची माहिती अभ्यंकर यांनी दिली.
advertisement
त्यांनी पुढे म्हटले की, मनसे म्हणून आमची सगळी कामे सुरू आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने बैठका सुरू आहेत. आमच्यासाठी राज ठाकरे काय सांगतात ते महत्त्वाचे आहे. मागील अनेक वर्ष मनसे रस्त्यावर उतरून काम करत आहे. त्यामुळे आम्हाला जनमानसाचा अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2025 3:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Elections : BMC साठी ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? मनसेच्या बड्या नेत्यानं दिली महत्त्वाची अपडेट