MHADA Homes : मुंबईकरांची भाड्याने घर शोधण्याची कटकट मिटणार; म्हाडाने घेतला मोठा निर्णय

Last Updated:

Mhada Rental Homes 2025 : मुंबईतील वाढत्या घरभाड्यांच्या पार्श्वभूमीवर म्हाडाने भाडेतत्त्वावर घरे उपलब्ध करून देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मध्यमवर्गीय आणि गरजू मुंबईकरांना परवडणाऱ्या दरात घर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Mhada Rental Homes 2025
Mhada Rental Homes 2025
मुंबई : पुणे आणि मुंबई अशा मोठ्या शहरात स्वत:चं घर असावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र गेल्या काही वर्षांत घरांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाल्याने हे स्वप्न सर्वसामान्यांसाठी अधिक कठीण बनलं आहे. त्यामुळे अनेकजण म्हाडाच्या घरांकडे आशेने पाहतात किंवा लॉटरीच्या प्रतीक्षेत राहतात. अशातच आता म्हाडाकडून दिलासा देणारी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
advertisement
म्हाडाने घेतला मोठा निर्णय
मुंबईसह संपूर्ण मुंबई उपनगरात नोकरी, शिक्षण, व्यवसाय किंवा वैद्यकीय कारणांसाठी दररोज मोठ्या प्रमाणात लोक येत असतात. मात्र या लोकांसाठी परवडणारी भाड्याची घरे शोधणे अनेकदा अवघड ठरते. हीच समस्या लक्षात घेऊन म्हाडाने भाडेतत्त्वावरील घरांसाठी स्वतंत्र धोरण आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे घरांची विक्री करण्यासोबतच लवकरच म्हाडा भाडेतत्त्वावरही घरे उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे.
advertisement
राज्य सरकारच्या मार्गदर्शनानुसार हे धोरण तयार होत असून त्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या पोर्टलच्या माध्यमातून इच्छुक नागरिकांना थेट म्हाडाची भाड्याची घरे मिळू शकणार आहेत. या निर्णयामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईसारख्या भागात घर खरेदी करणे परवडत नसलेल्या नोकरदार, विद्यार्थी आणि स्थलांतरितांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. अनेकांना घर विकत घेणे शक्य नसल्याने भाड्याच्या घरांवरच अवलंबून राहावे लागते, मात्र खाजगी भाडे बाजारातील जास्त दर आणि अटी-शर्तींमुळे अडचणी निर्माण होतात. अशा परिस्थितीत म्हाडाची भाडेतत्त्वावरील घरे उपयुक्त ठरणार आहेत.
advertisement
दरम्यान, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात घरे उभारण्यात आली आहेत. म्हाडाच्या कोकण मंडळानेही या योजनेतून हजारो घरे बांधली आहेत. मात्र उत्पन्न मर्यादा आणि देशात अन्यत्र घर नसण्याच्या अटींमुळे सुमारे 52 हजारांहून अधिक घरे आजही विक्रीविना पडून आहेत. हीच घरे भाडेतत्त्वावर उपलब्ध झाल्यास सामान्य नागरिकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
MHADA Homes : मुंबईकरांची भाड्याने घर शोधण्याची कटकट मिटणार; म्हाडाने घेतला मोठा निर्णय
Next Article
advertisement
Tejasvee Ghosalkar Join BJP: तेजस्वी घोसाळकरांचा अखेर भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'
तेजस्वी घोसाळकरांचा अखेर भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'
  • तेजस्वी घोसाळकरांचा अखेर भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'

  • तेजस्वी घोसाळकरांचा अखेर भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'

  • तेजस्वी घोसाळकरांचा अखेर भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'

View All
advertisement