मोठी बातमी! भाविकांना घेऊन जाणारी बस अलकनंदा नदीत कोसळली, महाराष्ट्रातील प्रवाशांवर काळाचा घाला
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे चारधाम यात्रेच्या बसचा अपघात झाला. बस अलकनंदा नदीत कोसळली, ज्यात ७ जण जखमी झाले आणि १० जण बेपत्ता आहेत. बचाव कार्य सुरू आहे.
चारधाम यात्रा करण्यासाठी महाराष्ट्रातून निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. चारधामला दर्शनासाठी पोहोचण्याआधीच नियतीनं घात केला. रस्त्यात काळानं गाठलं आणि नको तेच घडलं. भररस्त्यात ट्रकने प्रवाशांनी भरलेल्या बसला जोरदार धडक दिली. त्यानंतर बस थेट अलकनंदा नदीत कोसळली. उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील बद्रीनाथ महामार्गावर गुरुवारी एक भीषण अपघात झाला.
अपघात नेमका कसा झाला?
केदारनाथहून बद्रीनाथला जाणाऱ्या टेम्पोने खासगी बसला धडक दिली. या धडकेमुळे नियंत्रण सुटल्याने बस अलकनंदा नदीत कोसळली. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात एकूण सात जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन महिला, दोन मुले आणि तीन पुरुषांचा समावेश आहे, ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 10 जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे, ज्यांच्या शोधासाठी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे.
advertisement
कोणत्या कोणत्या राज्यातले प्रवासी होते?
बसमध्ये एकूण 20 प्रवासी होते. बसमध्ये चालकासह एकूण २० जण होते. ७ प्रवासी गुजरातचे, २ महाराष्ट्राचे आणि ७ राजस्थानचे होते. चालक हरिद्वारचा रहिवासी होता. याशिवाय दोन जण मध्य प्रदेशचे होते. अपघातात जखमी झालेल्या टेम्पो ट्रॅव्हलर चालक सुमितने सांगितले की, तो केदारनाथहून बसने बद्रीनाथला जात होता. यादरम्यान एका ट्रकने टेम्पो ट्रॅव्हलरला धडक दिली, ज्यामुळे टेम्पो ट्रॅव्हलर नदीत पडला. त्याने सांगितले की, टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये एकूण १९ लोक होते.
advertisement
जखमींची संपूर्ण यादी
१- दीपिका सोनी, राजस्थान, वय ४२ वर्षे.
२- हेमलता सोनी, राजस्थान, वय ४५ वर्षे.
३- ईश्वर सोनी, गुजरात, वय ४६ वर्षे.
4- अमिता सोनी, मीरा रोड, महाराष्ट्र, वय 49 वर्षे.
5- सोनी भावना ईश्वर, गुजरात, वय 43 वर्षे.
advertisement
६- भव्य सोनी, गुजरात, वय ०७ वर्षे.
7- पार्थ सोनी, मध्य प्रदेश, वय 10 वर्षे.
8- सुमित कुमार, हरिद्वार, वय 23 वर्षे.
Uttarakhand के मुख्यमंत्री Pushkar Singh Dhami ने Rudraprayag Bus Accident पर दुख जताया#Uttarakhand #RudraprayagBusAccident #BadrinathHighway #uttarakhandaccident #alaknandariver@anchorsapna @pri_kandpal pic.twitter.com/E0hHkVp8sw
— News18 India (@News18India) June 26, 2025
advertisement
आतापर्यंत तीन मृतदेह सापडले आहेत. या अपघातात मृतांची संख्या वाढली आहे. उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे बस अलकनंदा नदीत पडल्यानंतर, लोकांचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. घटनास्थळी सोनार उपकरणे पाठवण्यात आली आहेत. अलकनंदा नदीत बेपत्ता बसचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ध्वनी लहरींद्वारे बसचे स्थान शोधले जाईल. नदीला पाणी जास्त असल्याने आणि वातारणामुळे बचाव कार्यात अनेक अडथळे येत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 26, 2025 12:11 PM IST
मराठी बातम्या/देश/
मोठी बातमी! भाविकांना घेऊन जाणारी बस अलकनंदा नदीत कोसळली, महाराष्ट्रातील प्रवाशांवर काळाचा घाला