Monsoon : पावसाळ्यात चहा सोबत गरमागरम भजीचा आस्वाद घेताय? सावधान हे 5 फूड्स कॉम्बिनेशन ठरू शकतात घातक
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
पावसाळ्यात अनेकजणांना चहा सोबत गरमागरम भजीचा आस्वाद घ्यायला आवडतो. तर काहींना चहा सोबत बिस्कीट, केक सारख्या गोष्टी खायला सुद्धा आवडतात. मात्र तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की चहा सोबत हे फूड कॉम्बिनेशन आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. अनेक रिसर्च समोर आले आहेत की ज्यात चहा सोबत तळलेल्या गोष्टी टाळायला हव्यात असे सांगण्यात आले आहे. मात्र याची कारण नेमकी काय आहेत आणि याचा आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो याविषयी जाणून घेऊयात.
एका रिपोर्टनुसार चहा सोबत बिस्कीट, केक आणि चॉकलेट सारख्या गोड पदार्थांचं सेवन करू नये. चहामध्ये साखर असते अशात जर तुम्ही बिस्कीट किंवा केक इत्यादी साखरयुक्त पदार्थांचे सेवन केले तर ब्लड शुगर वाढू शकते. यामुळे तुमची एनर्जी कमी होऊ शकते. तसेच अधिक प्रमाणात चहा आणि बिस्कीट खाल्ल्याने बीपी, बेली फॅट, ऍसिडिटी तसेच पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
advertisement
चहा सोबत गरमागरम भजी खाणे अनेकांना आवडते. पावसाळ्यात तर हे कॉम्बिनेशन ठरलेलं असतं. मात्र चहा सोबत तळलेले आणि ऑयली पदार्थ खाणं टाळायला हवं. यामुळे डायजेस्टिव सिस्टम खराब होऊ शकते आणि अपचनाची समस्या वाढू शकते. यामुळे लोकांना अधिक सुस्ती येते आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा अशा आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होऊ शकतात.
advertisement
चहामध्ये दूध टाकून पिणे सुद्धा नुकसानदायक ठरू शकते. अनेकजण दुधाची चहा पितात मात्र यामुळे चहातील एंटीऑक्सीडेंटचे लाभ कमी होऊ शकतात. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार चहा सोबत कोणतेही डेअरी प्रोडक्टचे सेवन करणं उचित मानलं जात नाही. तेव्हा दुधाची चहा पिण्यापेक्षा लोकांनी ब्लॅक टीचे सेवन करावे असा सल्ला तज्ज्ञ देतात.
advertisement
advertisement
advertisement