पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, या महत्त्वाच्या मार्गावर अवजड वाहनांना बंदी, पर्यायी मार्ग कोणते?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कात्रज बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कात्रज बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. 15 ऑक्टोबरपासून, कात्रजकडून किवळेकडे जाणाऱ्या मार्गावर सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत जड आणि अवजड वाहनांना मार्गात प्रवेश मिळणार नाही. ही बंदी पुढील आदेश येईपर्यंत लागू राहील. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल.
या मार्गांवर जड, अवजड वाहनांना प्रवेशबंदी
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुणे – बेंगलोर महामार्ग क्रमांक 48 व महामार्ग क्रमांक 4 कडे जाणाऱ्या मार्गिकेवर (जुना-मुंबई पुणे महामार्ग) किवळेकडून कात्रजकडे जाणाऱ्या मार्गावर सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत ही बंदी राहणार आहे.
सातारा-सांगली-कोल्हापूर मार्गावरील वाहने शिंदेवाडी टोलनाक्यापुढे प्रवेश करू शकणार नाहीत.
नवी मुंबई, ठाणे, रायगड मार्गावरील बेंगळुरू महामार्गावरून जाणारी वाहने उर्से टोलनाक्यापुढे थांबवली जातील.
advertisement
जुना मुंबई-पुणे महामार्गावरील वाहने वडगाव फाट्यापुढे मार्गात प्रवेश करू शकणार नाहीत.
दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील वाहने आणि पुणे शहराच्या अंतर्गत भागातील वाहतुकीस या बंदीचे नियम लागू होणार नाहीत. त्यामुळे वाहनचालकांनी योग्य पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवास करावा.
advertisement
प्रवाशांनी आणि वाहनचालकांनी या नियमाचे पालन करून वाहतूक सुरळीत ठेवावी अशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 09, 2025 8:51 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, या महत्त्वाच्या मार्गावर अवजड वाहनांना बंदी, पर्यायी मार्ग कोणते?