TRENDING:
advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी बातम्या (PM Narendra Modi Marathi News)

नरेंद्र दामोदरदास मोदी ( Narendra Damodardas Modi) हे 2014पासून भारताचे पंतप्रधान ( Prime Minister) आहेत. बिगर काँग्रेस पक्षाचे सर्वांत जास्त काळ पंतप्रधान असणारे ते भारतातले एकमेव नेते ठरले आहेत. 2014 आणि 2019 अशा सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने भरघोस यश मिळवलं आणि ते सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. ते वाराणसीचे खासदार आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुशीतून घडलेले नेते आहेत.

नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 डिसेंबर 1950 रोजी गुजरातमधल्या वडनगर गावी ओबीसी हिंदू कुटुंबात झाला. त्यांच्या आईचं नाव हिराबेन, तर वडिलांचं नाव दामोदरदास मूलचंद मोदी. नरेंद्र मोदी यांचे वडील वडनगरच्या रेल्वे स्टेशनवर चहा विकायचे. त्यांना नरेंद्रही मदत करायचे. मोदी यांनी 1967पर्यंत आपलं शिक्षण वडनगरमधल्या विद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षण दिल्ली विद्यापीठ व अहमदाबाद विद्यापीठामधून घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय सहभाग घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम सुरू केलं.

मोदी यांनी आपल्या कामाच्या जोरावर अल्पावधीतच पक्षात महत्त्वाचं स्थान प्राप्त केलं. गुजरातमध्ये पक्षाच्या अनेक कामांमध्ये त्यांनी जीव ओतून काम केलं. 2001मध्ये मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांची खालावती तब्येत, त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि भूज भूकंपानंतरची परिस्थिती हाताळण्यात आलेलं अपयश यांमुळे त्यांच्याकडून सूत्रं काढून घेऊन भाजप नेतृत्वाने नरेंद्र मोदी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रं दिली. 7 ऑक्टोबर 2001 रोजी त्यांनी गुजरातमध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री (chief Minister) म्हणून शपथ घेतली. तोपर्यंत त्यांनी कोणतीही निवडणूक लढवली नव्हती. फेब्रुवारी 2002मध्ये राजकोट पोटनिवडणूक जिंकून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर 2014मध्ये पंतप्रधान होईपर्यंत ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. म्हणजेच एकूण चार वेळा ते मुख्यमंत्री झाले. त्यांनी गुजरातमध्ये केलेल्या विकासकामांना देशात “गुजरात मॉडेल” (Gujarat Model) म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या नेतृत्वाखाली गुजरातची भरभराट झाली.

मोदींची लोकप्रियता लक्षात घेऊन भाजपने 2014मध्ये त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून उभं केलं. 2014 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत त्यांनी देशात जवळपास 437 रॅली केल्या आणि काँग्रेसवर कडाडून टीका केली. मोदी यांचं व्यक्तिमत्त्व आणि ओघवत्या भाषणांनी प्रभावित होऊन जनतेने भाजपला प्रचंड बहुमतांनी निवडून दिलं आणि मोदी भारताचे पंतप्रधान झाले. 26 मे 2014 रोजी त्यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

सत्तेत आल्यानंतर पहिल्याच वर्षात पंतप्रधान मोदींनी ‘मेक इन इंडिया’, स्वच्छ भारत, उज्ज्वला गॅस योजना, देशातल्या प्रत्येक नागरिकाचं बँकेत खातं उघडण्यासाठी जन-धन योजना आणि गरिबांच्या आरोग्यासाठी आयुष्मान भारत आदी योजना सुरू केल्या. भारतात डिजिटल क्रांती घडवून आणण्याचं श्रेय मोदी यांना जातं. मोदी यांनी कार्यकाळात अनेक धाडसी निर्णय घेतले. त्याचे दूरगामी परिणाम देशाचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणावर झाले. 8 नोव्हेंबर 2016 रोजी घेतलेला निश्चलनीकरणाचा म्हणजेच नोटबंदीचा निर्णय, 2016 मध्ये पाकिस्तानमध्ये घुसून केलेला सर्जिकल आणि एअर स्ट्राइक, 2017मधला जीएसटी लागू करण्याचा निर्णय, तिहेरी तलाक बेकायदा ठरवणं, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं 370 कलम रद्द करण्याचा घेतलेला निर्णय, 2020मधला नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्याचा निर्णय, 2021मध्ये तीन कृषी कायदे लागू करणं आणि शेतकऱ्यांच्या प्रदीर्घ आंदोलनानंतर ते मागे घेण्याचा निर्णय आदी निर्णयांचा त्यात समावेश आहे. यातल्या अनेक निर्णयांवरून वादही झाले; मात्र मोदींची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

गुजरातमध्ये 2002मध्ये मुख्यमंत्री असताना मोदींनी जातीय दंगल घडवून आणल्याचा आरोप होता. त्यात त्यांना न्यायालयाने दोषमुक्त केलं. लग्न झालं असताना मोदी यांनी आपण अविवाहित असल्याचं निवडणूक प्रचारादरम्यान जाहीर केलं होतं. विरोधी पक्षाने त्यांच्यावर जोरदार टीका केल्यानंतर त्यांनी आपण विवाहित असल्याचं मान्य केलं; मात्र जसोदाबेन यांच्याशी त्यांचा झालेला विवाह नाममात्र होता आणि विवाहानंतर थोड्याच काळात ते पत्नीपासून दूर गेले होते.

मोदी यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यात दक्षिण कोरियाचा सियोल शांती पुरस्कार , सौदी अरेबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘द ऑर्डर ऑफ अब्दुलाज़ीझ अल सौद’ (The Order of Abdulaziz Al Saud award), अफगाणिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार अमीर अमानुल्ला खान पुरस्कार, चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड, संयुक्त अरब अमिरातीचा ऑर्डर ऑफ जयद नावाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान सेंट अँड्र्यू ऑर्डर आदींचा समावेश आहे.

अजून दाखवा …

सर्व बातम्या

सुपरहिट बॉक्स

Fast Charging स्मार्टफोनसाठी खरंच फायद्याची? एकदा अवश्य घ्या जाणून
WhatsApp च्या कोट्यवधी यूझर्ससाठी गुडन्यूज! आलंय नवं फीचर
अचानक पहिलं प्रेम डोळ्यासमोर येईल! आजचं लव्ह राशीफळ कोणासाठी कसं असेल
OnePlus ते Realme पर्यंत! हे आहेत 3 हजार रुपयांच्या आतील बेस्ट Earbuds
PM Kisan Yojana : या तारखेला येणार PM Kisan योजनेचा 19 वा हप्ता
बळीराजाचा देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मान होणार, पुरस्कारासाठी नोंदणी सुरू
कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या 5 महिला शेतकरी तुम्हाला माहीत आहेत का?
Tata, Mahindra विसरा, भारतात येतेय सर्वात स्वस्त EV कार, किंमत फक्त 4 लाख!
Bajaj ने टाकला मोठा डाव, आणतेय 137 किमी चालणारी मजबूत स्कूटर!
दहा गुंठ्यातून लाखोंचा नफा, झेंडू उत्पादक शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल