Vitamin D Benefits: हिवाळ्यात कसं मिळवायचं ‘व्हिटॅमिन डी’? ‘व्हिटॅमिन डी’ साठी किती वेळ उन्हात बसावं?
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Benefits of Vitamin D in Marathi: हाडांची ठिसूळता दूर करून हाडांना मजबूती देण्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘व्हिटॅमिन डी’ फायद्याचं ठरतं. त्यामुळे विविध आजारांपासून असलेला संक्रमणाचा धोका टळतो. कॅन्सर आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यामध्ये सुद्धा ‘व्हिटॅमिन डी’ महत्त्वाची भूमिका बजावतं.
मुंबई : हिवाळ्यात उन्हाच्या किंवा सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे अनेकांना ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेचा सामना करावा लागतो. आपल्या शरीराचं कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी ‘व्हिटॅमिन डी’ हे महत्त्वाचं मानलं जातं. हाडांची ठिसूळता दूर करून हाडांना मजबूती देण्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘व्हिटॅमिन डी’ फायद्याचं ठरतं. त्यामुळे विविध आजारांपासून असलेला संक्रमणाचा धोका टळतो. कॅन्सर आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यामध्ये सुद्धा ‘व्हिटॅमिन डी’ महत्त्वाची भूमिका बजावतं.
‘व्हिटॅमिन डी’ तयार होण्यासाठी सूर्यप्रकाश महत्त्वाचा मानला जातो. मात्र हिवाळ्यात थंडीमुळे योग्य त्या प्रमाणात सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे ‘व्हिटॅमिन डी’ ची कमतरता निर्माण होऊन हाडं, दात आणि स्नायूंच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. याशिवाय रक्तदाब म्हणजेच ब्लडप्रेशरचा त्रासही होऊ शकतो. ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊन अंगीदुखी, थकवा असे आजार जडू शकतात. ज्यामुळे मानसिक ताणतणावही वाढण्याची भीती असते. ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता भरून काढण्यासाठी अनेक जण औषधं किंवा ‘व्हिटॅमिन डी’ सप्लिमेंट्स घेतात. मात्र आज आम्ही तुम्हाला असे सोपे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता भासणार नाही.
advertisement
याशिवाय नेमक्या कोणत्या वेळी आणि किती वेळ सूर्यप्रकाशात बसावं ते सुद्धा जाणून घेऊयात.
सूर्यप्रकाश आणि ‘व्हिटॅमिन डी’
सकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्याने शरीरात व्हिटॅमिन तयार व्हायला मदत होते. त्यामुळे सूर्यप्रकाशापासून ‘व्हिटॅमिन डी’ मिळविण्यासाठी सकाळी 8 ते 10 या वेळेत उन्हात बसणं फायदेशीर मानले जाते. उन्हाळ्यात गरमीमुळे 20 ते 25 मिनिटे आणि हिवाळ्यात दोन तास सूर्यप्रकाशात बसणं फायद्याचं मानलं जातं. मात्र यापेक्षा जास्त वेळ सूर्यप्रकाशात बसलात तर सूर्यांच्या अतिनील किरणांमुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं.
advertisement
हे सुद्धा वाचा :Vitamin D Without Sunlight: हिवाळ्यात कमी सूर्य प्रकाशात व्हिटॅमिन डी कसं मिळवाल? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
सूर्यप्रकाशाचे फायदे
सूर्यप्रकाशात बसल्याने किंवा चालण्याने अनेक फायदे होतात. सूर्यप्रकाशामुळे शरीराला उर्जा मिळते. सूर्यप्रकाशापासून शरीराला UVA मिळतं. त्यामुळे आपला रक्तप्रवाह सुधारायला मदत होते. सूर्यप्रकाशामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी सुधारते. त्यामुळे डायबिटीस नियंत्रणात राहायाला मदत होते. जर तुम्हाला निद्रानाशाचा विकार किंवा झोपेसंदर्भात कोणते आजार असतील तर सूर्यप्रकाश हा फायद्याचा ठरतो. सूर्यप्रकाशात मेलाटोनिन नावाचे हार्मोन असतं. ज्यामुळे गाढ झोप यायला मदत होते.
advertisement
शरीराला किती प्रमाणात ‘व्हिटॅमिन डी’ची गरज?
दात, हाडं आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी शरीराला ‘व्हिटॅमिन डी’ ची गरज असते. शरीरातील कॅल्शियम हाडांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘व्हिटॅमिन डी’ मदत करतं. एका निरोगी व्यक्तीला एका दिवसात 37.5 ते 50 mcg ‘व्हिटॅमिन डी’ ची आवश्यकता असते. तर वाढत्या वयाच्या मुलांना दररोज किमान 25 mcg ‘व्हिटॅमिन डी’ आवश्यक असतं. ‘व्हिटॅमिन डी’ हे एक असं पोषक तत्व आहे जे चरबीमध्ये विरघळतं. त्यात ‘व्हिटॅमिन डी1’, ‘व्हिटॅमिन डी2’, ‘व्हिटॅमिन डी3’ असतात. सूर्यप्रकाशामुळे त्वचा आपोआप ‘व्हिटॅमिन डी’ तयार करू लागते.
advertisement
सूर्यप्रकाश नाही तर या आहारातून मिळवा ‘व्हिटॅमिन डी’

गायीचं दूध
दुधात ‘व्हिटॅमिन डी’ चांगल्या प्रमामात आढळून येतं. तुम्हाला ‘व्हिटॅमिन डी’ ची कमतरता भरून काढायची असेल कर रोज एक ग्लास गायीचं दूध पिणं फायद्याचं ठरतं. म्हशीच्या दुधातही ‘व्हिटॅमिन डी’ असतं. मात्र गायीच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधात फॅट्स आणि कॅलरीज जास्त असतात.
advertisement
दही
दह्यातही चांगल्या प्रमाणात ‘व्हिटॅमिन डी’ आढळून येतं. याशिवाय दही हे प्रोबायोटिक्स असल्यानेची शरीराला अन्य फायदे सुद्धा होतात.
संत्र्याचा रस
संत्र्याच्या रसात व्हिटॅमिन सी असतं हे आपल्याला माहितीच आहे. मात्र संत्र्यांमध्ये ‘व्हिटॅमिन डी’ हे सुद्धा चांगल्या प्रमाणात आढळून येतं. संत्री खाल्ल्याने किंवा संत्र्याचा रस नियमितपणे प्यायल्याने ‘व्हिटॅमिन डी’ ची कमतरता व्हायला मदत होते.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 07, 2025 1:24 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Vitamin D Benefits: हिवाळ्यात कसं मिळवायचं ‘व्हिटॅमिन डी’? ‘व्हिटॅमिन डी’ साठी किती वेळ उन्हात बसावं?