अधिकारी व्हावं, समाजासाठी काहीतरी करावं, असं प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं. मात्र हे स्वप्न साकार करण्यासाठी जिद्द, मेहनत आणि चिकाटीची गरज असते. अशीच जिद्द दाखवत कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील तन्मय मांडरेकर यांनी राज्य सेवा परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात ७वा क्रमांक मिळवत यशाची शिखरे गाठली आहेत.