Maharashtra CM Live Updates: महायुतीच्या बैठकीत काय ठरलं? सत्ता स्थापनेतील घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Last Updated:

Maharashtra Mahayuti Government Formation News Live Updates: राज्याच्या नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस मतदान झाले. महायुतीच्या पारड्यात 288 पैकी 234 जागा आल्या. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत तिढा सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे आज राजधानी दिल्लीत होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

maharashtra mahayuti government formation news live updates
maharashtra mahayuti government formation news live updates
मुंबई :  राज्याच्या नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस मतदान झाले. महायुतीच्या पारड्यात 288 पैकी 234 जागा आल्या. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत तिढा सुरू असल्याचे दिसून आले.  गुरुवारी, राजधानी दिल्लीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडली.  या बैठकीनंतर राज्यातील मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय झाला आहे.  जाणून घेऊयात लाईव्ह अपडेट्स...

Eknath Shinde : भाजपवर शिवसेनेचे दबावतंत्र? ''आमच्या नेत्याचा सन्मान ठेवून...'',शिंदेच्या शिलेदाराचं थेट आवाहन

नवी दिल्ली :  नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळालेल्या महायुतीमध्ये सत्ता स्थापनेवरून घोळ सुरू असल्याचे चित्र आहे. महायुतीच्या नेत्यांची आज बैठक होणे अपेक्षित असताना दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातील मूळ गावी गेले आहेत. तर, शिवसेना शिंदे गटाने दिल्लीत पत्रकार परिषद घेत भाजपला आवाहन केले आहे. मागील दोन दिवसातील घटनाक्रम पाहता शिवसेना शिंदे गटाने आता भाजपवर दबावतंत्र सुरू केले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

महायुतीचा घोळ संपेना! सोमवारचा शपथविधी लांबणीवर पडणार? समोर आली मोठी अपडेट

advertisement
मुंबई :  राज्यात महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सहभागी झाले होते. त्यानंतर आता भाजपकडून सत्ता स्थापन करण्याच्या प्रक्रिया वेगवान करण्यात आल्या. पण आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..
advertisement

Eknath Shinde : महायुतीमध्ये All Is Not Well, बैठक रद्द करुन शिंदेंनी तातडीनं मुंबई सोडली

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झालेलं नाहीय. दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक पार पडल्यानंतर तिन्ही नेत्यांची महाराष्ट्रात बैठक होणार होती. पण महायुतीची ही बैठक पुढे ढकलण्यात आलीय. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यात त्यांची मूळ गावी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
advertisement

महायुती सरकारसाठी दिल्लीत खलबतं, भाजप कोणती मंत्रिपदे सोडणार? समोर आली अपडेट

प्रतिनिधी : राज्यात महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सहभागी झाले होते. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची भाजपकडून कोंडी? ''आमची ऑफर स्वीकारा, नाहीतर...''

advertisement
राज्यात महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सहभागी झाले होते. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी विविध प्रस्ताव सादर केले. मात्र, त्यावर भाजपने पर्याय दिला आहे. शिंदे यांनी प्रस्तावाला होकार दिल्यानंतरच सत्ता स्थापनेच्या हालचाली पुढे सुरू राहणार असल्याचे भाजपच्या सूत्रांनी ‘न्यूज 18 लोकमत’ला सांगितले. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
advertisement

Maharashtra CM : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिवसेना-राष्ट्रवादीला कुठली खाती, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीची महत्त्वाची बैठक नवी दिल्लीमध्ये पार पडली. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह यांच्यासोबत तब्बल अडीच तास बैठक झाली. या बैठकीला भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्रिपद तसंच उपमुख्यमंत्रीपद आणि इतर महत्त्वाच्या खात्यांबाबत चर्चा झाली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

> अमित शाह यांच्यासोबत बैठक, फडणवीस यांना वरिष्ठांची पसंती, मंत्रिमंडळातील 15 चेहरे समोर!

advertisement
मुंबई : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचे उत्तर काही तासांतच मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेतून अप्रत्यक्षपणे माघार घेत असल्याचे सांगितल्यानंतर आता भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रात महायुतीच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार असल्याचे सांगण्यात येते. मुख्यमंत्रिपदासाठी केंद्रीय नेतृत्वाची फडणवीस यांनाच पसंती असल्याचे देखील सांगण्यात येते. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

> फडणवीस-अजितदादांचं हास्य, शिंदेच्या चेहऱ्यावर गांभीर्य, अमित शाहांसोबतच्या बैठकीचे Photo

नवी दिल्ली : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतचा फैसला दिल्लीमध्ये होणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक सुरू आहे. या बैठकीचे पहिले फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या चेहऱ्यावर हसू तर एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर गांभीर्य दिसत आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

बैठकीला जातोय, चर्चा करून निर्णय घेऊ, दिल्लीत पोहोचताच एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

कोणत्याही पदापेक्षा मला लाडका भाऊ ही मोठी पदवी मिळाली आहे. लाडका भाऊ पुढील निर्णयासाठी दिल्लीत दाखल झाला आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. विमानतळावर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

> अमित शाहांसोबतच्या बैठकीआधी फडणवीस-अजितदादांची बैठक, सुनील तटकरे देखील उपस्थित

अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीआधी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात महत्त्वाची बैठक संपन्न होत आहे. त्याआधी फडणवीस यांनी ज्येष्ठ भाजप नेते भूपेंद्र यादव यांची भेट घेतली. पुढच्या काही वेळातच महायुतीच्या नेत्यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक संपन्न होईल.

> एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडलेला नाही: उदय सामंत 

एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील पत्रकार परिषदेनंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्याचे अनेकांनी म्हटले. परंतु एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडलेला नाही, असे शिवसेना नेते उदय सामंत निक्षून सांगितले आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

> अमित शाहांसोबत बैठक, एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना

> अमित शाहांच्या बैठकीआधी पुन्हा संशयाचं धुकं, एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवर अजित पवारांचं मोठं वक्तव्य

अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर बोलताना भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याला शिंदे यांचा 'अप्रत्यक्ष' पाठिंबा आहे, असे विधान केल्याने अमित शाहांसोबतच्या बैठकीआधी पुन्हा संशयाचे धुके तयार झाले. सविस्तर बातमी वाचण्याासाठी क्लिक करा...

> अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीआधी अजित पवार यांचा निर्णय, दिल्ली विधानसभा लढणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने राजधानी दिल्लीकडे आपला मोर्चा वळविण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचा गेलेला राष्ट्रीय दर्जा पुन्हा मिळविण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आगामी दिल्ली विधानसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

> काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना

महायुतीचा पुढील मुख्यमंत्री कोण याचा निर्णय आज होणार आहे. महायुतीच्या नेत्यांची रात्री दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.

> एकनाथ शिंदेच्या दिल्ली दौऱ्याआधी हालचालींना वेग, ठाण्यातील घरी आमदारांची गर्दी

मुंबई : राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप मुख्यमंत्री कोण हे ठरलेलं नाही. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय दिल्लीत होणार आहे. राज्यातील तिन्ही पक्षांच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार असून यात मुख्यमंत्री कोण हे ठरणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सायंकाळी दिल्लीसाठी रवाना होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याआधीच हालचालींना वेग आला आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा...

> एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याआधी शिरसाटांचे मोठं वक्तव्य; भाईंच्या मनात चाललंय तरी काय?

मुंबई : विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून तिढा सुरू आहे. आज, दिल्लीत महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबतचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सायंकाळी दिल्लीसाठी रवाना होणार आहे. त्यापूर्वीच शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते, आमदार संजय शिरसाट यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

> भाजपचा मुख्यमंत्री होणार, कुणाला किती मंत्रिपदं? सत्ता वाटपाचा फॉर्म्युला कसा? मोठी माहिती समोर

मुंबई : एकीकडं मुख्यमंत्री कोण याची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडं महायुतीच्या सत्तावाटपाचं सूत्र ठरल्याचं बोललं जातंय. विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपला राज्याच्या सत्तेत मोठा वाटा मिळणार आहे.त्या खालोखाल शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळणार आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra CM Live Updates: महायुतीच्या बैठकीत काय ठरलं? सत्ता स्थापनेतील घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement