Astrology Raj Yoga : 2 राजयोग बदलणार 3 राशींचं नशीब! जुलैपर्यंत 'सुवर्णकाळ', ज्योतिषांची भविष्यवाणी
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह, ताऱ्याचा एका ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश होतो. आता 15 जूनला सूर्याचा वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश झाला. या ग्रहप्रवेशातून काही शुभ योग जुळून येणार आहेत. यातून काही राशींच्या व्यक्तींना प्रेम, पैसा, प्रमोशन असं सारंकाही त्यांच्या मनासारखं मिळेल. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
झारखंडमधील देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी सांगितलं की, सूर्याचा मिथुन राशीत प्रवेश झाल्यानं त्रिग्रही योग जुळून आला आहे. कारण मिथुन राशीत आधीपासूनच बुध आणि शुक्र ग्रह विराजमान होते. त्यामुळे या राशीत केवळ त्रिग्रहीच नाही तर बुध आणि सूर्यापासून बुधादित्य राजयोगही (Astrology Raj Yoga) निर्माण होईल. तर, शुक्र आणि सूर्यापासून शुक्रादित्य योग जुळून येतोय. या 2 राजयोगांमुळे 3 राशींच्या व्यक्तींचं नशीब अक्षरश: उजळून निघणार आहे.
advertisement
मिथुन : याच राशीत त्रिग्रही योगासह 2 राजयोग निर्माण होणार आहेत. त्यामुळे अर्थातच या राशींच्या व्यक्तींवर अत्यंत सकारात्मक प्रभाव पडेल. आपली लहानातली लहान अडचण संपुष्टात येईल. अडलेली सर्व कामं मार्गी लागतील. पालकांना मुलांकडून शुभवार्ता मिळतील. व्यावसायिकांनाही धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत बढती मिळू शकते. कुटुंबातील वातावरण आनंदाचं असेल.
advertisement
कर्क : आपल्यासाठी त्रिग्रही योग शुभ ठरेल. घरात शुभ कार्य पार पडू शकतं. शिवाय अध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल. जोडीदारासोबत अत्यंत चांगला वेळ घालवाल. लक्ष्मी देवीच्या कृपेने आपल्याला धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. जोडीदारासोबत सुखाचे क्षण घालवाल. खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असल्यामुळे उत्तम बचत होईल. वैवाहिक जीवनात सुख येईल. जोडीदारासोबत चांगला प्रवास होईल.
advertisement
कुंभ : आपल्यावरही त्रिग्रही योगाचा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. घर किंवा वाहन खरेदीचाही योग आहे. समाजात आपला मान-सन्मान वाढेल. आपली आर्थिक स्थिती भक्कम होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता यश मिळू शकतं. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ही वेळ अनुकूल आहे. केलेल्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. नव्या कामाचीही सुरूवात करू शकता. नोकरीच्या शोधात असाल तर आता चांगली संधी मिळेल.
advertisement
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.