पुण्यात मेट्रो स्थानाकाजवळ बसचा अपघात; वाहतुकीचा खोळंबा, पुणे-मुंबई मार्गावर बदल
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुणे शहरात मध्यरात्रीच्या सुमारास मेट्रो स्थानकाच्या खांबाला खासगी आराम बसने धडक दिल्याची घटना घडली आहे
पुणे: पुणे शहरात मध्यरात्रीच्या सुमारास मेट्रो स्थानकाच्या खांबाला खासगी आराम बसने धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातामुळे आरबीआय मेट्रो स्थानक परिसरातील पुणे-मुंबई रस्ता मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पाठीमागून येणारा एक ट्रक धडकलेल्या बसवर आदळल्याने ही दुर्घटना आणखी गंभीर झाली. यामुळे अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्याचे काम सुरू असल्याने एक मार्गिका तात्पुरती बंद करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली आहे.
'शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम वेगाने सुरू आहे आणि आरबीआयजवळ मेट्रो स्थानक उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. अशातच मध्यरात्री आराम बस खांबावर आदळली आणि त्यानंतर आलेल्या ट्रकने बसला पाठीमागून धडक दिली. अपघातामुळे मार्गावर कोंडी होण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आलं आहे. आज कार्यालयीन कामकाजाचा पहिला दिवस म्हणजेच सोमवार असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
advertisement
नालासोपाऱ्यात भीषण अपघात -
दरम्यान नालासोपारा येथूनही एका हृदयद्रावक अपघाताची घटना समोर आली आहे. वज्रेश्वरी देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या एका कुटुंबासोबत भयानक घटना घडली. जिथे सात वर्षाच्या चिमुकल्याचा अपघातात दुर्देवी अंत झालेला आहे.
अपघात घडला तरी कसा?
view commentsआचोळे येथील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या समीर थोरी (वय32) यांनी आपल्या पत्नी काजल आणि सात वर्षांच्या मुलगा हर्षला घेऊन शनिवारी संध्याकाळी वज्रेश्वरी देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. सर्व काही सुरळीत चालत असताना उसगाव येथील शिरसाड वज्रेश्वरी रोडवर अचानक भयावह घटना घडली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 15, 2025 11:44 AM IST










