TRENDING:
advertisement

शरद पवार बातम्या (Sharad Pawar Marathi News)

महाराष्ट्राचं राजकारण ज्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही ते नाव म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) मुरब्बी, द्रष्टे, कृषिप्रश्नाची उत्तम जाण असलेले, प्रशासनावर पकड असलेले आणि जनमानसात आदराचं स्थान असलेले राजकीय नेते म्हणजे शरद पवार. ते सत्तेत असोत किंवा नसोत, महाराष्ट्राचं राजकारण त्यांच्याभोवती फिरतं असं म्हटलं जातं.

शरद गोविंदराव पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी पुणे जिल्ह्यात बारामतीमध्ये (Baramati) झाला. त्यांच्या आई शारदाबाई 1938 मध्ये पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या शिक्षण समितीच्या प्रमुख होत्या, तर वडील बारामतीतल्या सहकारी बँकेचे पहिले व्यवस्थापक होते. कॉलेजमध्ये असताना तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या भाषणाने ते प्रभावित झाले. चव्हाणांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी पवारांमधले नेतृत्वगुण हेरले आणि वेळोवेळी मार्गदर्शन केलं. चव्हाणांच्या सांगण्यावरून शरद पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि वयाच्या 24व्या वर्षी ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. पवार यशवंतरावांना आपले राजकीय गुरू मानतात.

1967 साली पवारांनी पहिल्यांदा बारामती मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. वयाच्या 29व्या वर्षी वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. त्यानंतर 1972 आणि 1978 सालच्या निवडणुकीतही ते सलग विजयी झाले. पवार यांचे आणखी एक मार्गदर्शक वसंतदादा पाटील 1978 साली मुख्यमंत्री झाले; पण काँग्रेसचे 12 आमदार फोडून शरद पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच ‘पुलोद’चं सरकार स्थापन केलं. वयाच्या 38व्या वर्षी पवार महाराष्ट्राचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री बनले. ‘माझ्या पाठीत खंजीर खुपसला ’अशी प्रतिक्रिया वसंतदादा पाटील यांनी दिली होती. हे सरकार दीड वर्षापेक्षा जास्त काळ चाललं होतं. जनता पक्षात फूट पडली. इंदिरा गांधींच्या (Indira Gandhi) शिफारशीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि पवारांचं हे पहिलं सरकार बरखास्त झालं.

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी (Rajeev Gandhi) यांनी सूत्रं हाती घेतली आणि शरद पवारांनी परत काँग्रेसमध्ये येऊन काम करावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यानुसार 1984 साली बारामतीमधून त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली; पण महाराष्ट्रातल्या काँग्रेसलाही भक्कम नेतृत्वाची गरज होती. शंकरराव चव्हाण यांना राजीव गांधी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं आणि काँग्रेसमध्ये परतलेले शरद पवार 1988मध्ये महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. त्याच वेळी शरद पवारांच्या हातून पंतप्रधानपदाची संधी पहिल्यांदा निसटली असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. राजीव गांधी यांच्या हत्येनंतरच्या निवडणुकीत काँग्रेसला पूर्ण नाही, पण जवळपास बहुमत मिळालं होतं; पण पवारांचं पंतप्रधानपद पुन्हा हुकलं आणि नरसिंह राव पंतप्रधान झाले. रावांच्या मंत्रिमंडळात शरद पवार संरक्षणमंत्री होते; पण राज्य काँग्रेसमधल्या अंतर्गत मतभेदांमुळे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना राजीनामा द्यावा लागला आणि 6 मार्च 1993 रोजी शरद पवार पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. पवारांची ही मुख्यमंत्रिपदाची चौथी कारकीर्द होती. ती खूप वादग्रस्त ठरली.

12 मार्च 1993 रोजी मुंबईत भीषण बॉम्बस्फोट झाले. सप्टेंबर महिन्यात लातूर आणि उस्मानाबादमध्ये भूकंप झाला. त्यात जळगाव सेक्स स्कँडल, गोवारी समाजातल्या मोर्चेकऱ्यांवर झालेला लाठीचार्ज, अण्णा हजारे यांनी वनखात्यातल्या भ्रष्टाचाराबाबत केलेलं उपोषण अशा अनेक घटना याच काळात घडल्या. याचा परिणाम म्हणजे 1995 मध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेसचा पराभव झाला आणि शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं.

सोनिया गांधी (Sonia Gandhi) विदेशी असल्याचा मुद्दा घेऊन पवारांनी 1999 मध्ये पी. ए. संगमा, तारिक अन्वर यांच्या सोबतीने राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. काँग्रेसमधलं शरद पवारांचं हे दुसरं बंड होतं. 1999मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली. 2004 मध्ये केंद्रात यूपीएचं सरकार आलं; पण सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हायला नकार दिला. शरद पवार तेव्हा काँग्रेसमध्ये असते तर पंतप्रधान झाले असते असं म्हटलं जातं. पवार या सरकारमध्ये 10 वर्षं कृषिमंत्री होते.

ज्याचा कुणालाही अंदाजही येत नाही ते शरद पवार करतात असं म्हटलं जातं, याची प्रचिती 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर आली. भाजपला बाजूला सारून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना अशा कुणी विचारही केला नव्हता अशा महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झालं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. राज्यात आणि केंद्रात अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या पवार यांनी शिक्षण, कृषी संस्थांसाठीही भरीव योगदान दिलं आहे. क्रिकेटमध्येही पवारांचा दबदबा आहे. त्यांनी ICC च्या अध्यक्षपदाबरोबरच कुस्तीसारख्या देशी खेळांनाही प्रोत्साहन दिलं. प्रचंड वाचन, अफाट स्मरणशक्ती, सांस्कृतिक, कला क्षेत्रातला त्यांचा वावर, राजकारणापलीकडे अन्य पक्षातल्या नेत्यांशी मैत्री, पुरोगामी विचार आदी गुणवैशिष्ट्यं असलेले शरद पवार कसलेले दूरदर्शी नेते आहेत.

प्रतिभा पवार या त्यांच्या पत्नी, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या त्यांच्या कन्या, तर अजित पवार (Ajit Pawar) हे त्यांचे पुतणे आहेत. कितीही व्यग्र असले तरी आपल्या कुटुंबासाठी शरद पवार आवर्जून वेळ काढतात.

अजून दाखवा …

सर्व बातम्या

सुपरहिट बॉक्स

Fast Charging स्मार्टफोनसाठी खरंच फायद्याची? एकदा अवश्य घ्या जाणून
WhatsApp च्या कोट्यवधी यूझर्ससाठी गुडन्यूज! आलंय नवं फीचर
अचानक पहिलं प्रेम डोळ्यासमोर येईल! आजचं लव्ह राशीफळ कोणासाठी कसं असेल
OnePlus ते Realme पर्यंत! हे आहेत 3 हजार रुपयांच्या आतील बेस्ट Earbuds
PM Kisan Yojana : या तारखेला येणार PM Kisan योजनेचा 19 वा हप्ता
बळीराजाचा देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मान होणार, पुरस्कारासाठी नोंदणी सुरू
कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या 5 महिला शेतकरी तुम्हाला माहीत आहेत का?
Tata, Mahindra विसरा, भारतात येतेय सर्वात स्वस्त EV कार, किंमत फक्त 4 लाख!
Bajaj ने टाकला मोठा डाव, आणतेय 137 किमी चालणारी मजबूत स्कूटर!
दहा गुंठ्यातून लाखोंचा नफा, झेंडू उत्पादक शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल