TRENDING:
advertisement
मराठी बातम्या » Tag » Chandra Grahan 2025

Chandra Grahan 2025

अवकाशात घडणाऱ्या घटना खगोलशास्त्रीयदृष्ट्या (Astronomy) महत्त्वाच्या असतात. चंद्रग्रहण (Lunar Eclipse) ही अशीच एक महत्त्वाची खगोलशास्त्रीय घटना आहे. सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्रग्रहण होतं. चंद्रग्रहण पौर्णिमेला होते; पण प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्रग्रहण होतं. चंद्र परिभ्रमण करत आधी पृथ्वीच्या उपछायेत येतो, तेव्हा चंद्रप्रकाश कमी होतो, यालाच ग्रहणाचे वेध लागणं असं म्हणतात. त्यानंतर चंद्र प्रछायेत (दाट छायेत) येतो, तेव्हा चंद्राचा भाग झाकोळलेला दिसतो, त्या वेळेस चंद्रग्रहण लागलं असं म्हणतात. तेव्हा चंद्राचा प्रकाश कमी होतो. काही वेळाने चंद्र या दाट छायेतून बाहेर पडतो तेव्हा चंद्रग्रहण सुटलं असं म्हटलं जातं. या छायेतून बाहेर आल्यावर चंद्र पुन्हा प्रकाशमान होतो.

चंद्र पूर्ण झाकला गेल्यास त्याचा खग्रास चंद्रग्रहण असं म्हणतात. जेव्हा चंद्राचा काही भागच (पृथ्वीवरून पाहिल्यास) पृथ्वीच्या सावलीत येतो, तेव्हा खंडग्रास चंद्रग्रहण होतं. ही सावली किती मोठी आहे यावर त्याचा प्रभाव अवलंबून असतो. ग्रहणाच्या वेळी चंद्राच्या इतर भागांवर गडद लालसर किंवा चॉकलेटी छटा दिसू शकतात. खंडग्रास चंद्रग्रहण वर्षातून दोनदा दिसू शकतं; पण खग्रास चंद्रग्रहण त्या मानाने दुर्मीळ असतं. साधारणतः दोन वर्षांतून एकदा ते दिसतं. साधारणपणे तीन ते चार वर्षांचं कालांतर चंद्रग्रहणात असू शकतं; पण चार वर्षांनंतर मात्र तीन किंवा सात (क्वचित दहा) वर्षांचा खंडही त्यात पडू शकतो. 21 व्या शतकापासून ते 30व्या शतकापर्यंत 12,064 चंद्रग्रहणं होतील असा अंदाज आहे. जगात त्या वेळी जिथे जिथे चंद्र असतो, तिथे चंद्रग्रहण दिसू शकतं.

2022 या वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर रोजी होतं, तर शेवटचं चंद्रग्रहण 8 नोव्हेंबरला. या वर्षातलं हे शेवटचं ग्रहण दिसण्याचा भूभाग असा – भारतासह अनेक आशियाई भागांमध्ये, तसंच पूर्व युरोप, ऑस्ट्रेलिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, पॅसिफिक अटलांटिक आणि हिंद महासागर.

ग्रहण ही खगोलीय घटना असली, तरी त्याला हिंदू धर्मात धार्मिक महत्त्वही (Religious Importance) आहे. सर्वसामान्यपणे ग्रहणाच्या वेळी काही नियम पाळले जातात. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना जास्त काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. ग्रहणकाळात सुतक काळ पाळला जातो. हा सुतक काळ सूर्यग्रहणापूर्वी 12 तास आधी, तर चंद्रग्रहणामध्ये 9 तास आधी पाळला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहण काही राशींसाठी शुभ किंवा अशुभ मानलं जातं. चंद्रग्रहण सुरू असताना स्वयंपाक करणं किंवा जेवणं, काही खाणं निषिद्ध मानलं गेलं आहे. ग्रहणकाळात मंदिरं, देवस्थानं बंद ठेवली जातात. घरातील देवघरही बंद करून ठेवावं, देवावर ग्रहणाची छाया पडू नये असं म्हटलं जातं.

ग्रहणकाळात शक्यतो बाहेर पडू नये असा सल्ला दिला जातो. ग्रहणकाळात गर्भवती स्त्रियांनी जास्त काळजी घ्यावी असाही सल्ला दिला जातो. या काळात गर्भवती स्त्रियांनी एका खोलीत बसून देवाचा जप करावा, काहीही खाऊ-पिऊ नये असं मानलं जातं. अर्थात याला वैज्ञानिक आधार आहे का यावरून वाद सुरू आहेत. त्याचप्रमाणे ग्रहणकाळात सर्वसामान्यांनीही काहीही खाऊ-पिऊ नये, झोपून राहू नये, घराची साफसफाई करू नये, कोणाशीही भांडण करू नये, शौचाला किंवा लघवीलाही जाऊ नये, असे सल्ले दिले जातात. अर्थात यावरून भरपूर वादविवाद होतात. ग्रहणकाळात फक्त स्नान करून मौनात राहून देवाची पूजा, जप, ध्यान करावं असं म्हटलं जातं.

चंद्रग्रहण ही अत्यंत सुंदर अशी खगोलशास्त्रीय घटना असल्यामुळे शक्यतो ग्रहण बघणं चुकवू नये.

अजून दाखवा …

सर्व बातम्या

सुपरहिट बॉक्स

Fast Charging स्मार्टफोनसाठी खरंच फायद्याची? एकदा अवश्य घ्या जाणून
WhatsApp च्या कोट्यवधी यूझर्ससाठी गुडन्यूज! आलंय नवं फीचर
अचानक पहिलं प्रेम डोळ्यासमोर येईल! आजचं लव्ह राशीफळ कोणासाठी कसं असेल
OnePlus ते Realme पर्यंत! हे आहेत 3 हजार रुपयांच्या आतील बेस्ट Earbuds
PM Kisan Yojana : या तारखेला येणार PM Kisan योजनेचा 19 वा हप्ता
बळीराजाचा देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मान होणार, पुरस्कारासाठी नोंदणी सुरू
कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या 5 महिला शेतकरी तुम्हाला माहीत आहेत का?
Tata, Mahindra विसरा, भारतात येतेय सर्वात स्वस्त EV कार, किंमत फक्त 4 लाख!
Bajaj ने टाकला मोठा डाव, आणतेय 137 किमी चालणारी मजबूत स्कूटर!
दहा गुंठ्यातून लाखोंचा नफा, झेंडू उत्पादक शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल