महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. जुलै महिन्यापासून या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होत आहेत. आतापर्यंत 5 हप्ते खात्यावर जमा झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य सरकारने 28 जून 2024 रोजी राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार आणि अविवाहित राज्यातील कुटुंबातील महिलेला दरमहा दिड हजार रुपये दिले जातात. एक म्हणजे तुमच्या शहरातील नगरपालिका, पंचायत, महानगरपालिकेची अधिकृत वेबसाइट किंवा नारीशक्तीदूत ॲप आणि योजनेची अधिकृत वेबसाइट.