TRENDING:
advertisement

आदित्य ठाकरे बातम्या (Aaditya Thakarey News)

शिवसेनेच्या (ShivSena) आक्रमक चेहऱ्याला तरुणाईची साथ देणारा चेहरा म्हणजे आदित्य ठाकरे (Aditya Thakarey). माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakarey) यांचा मुलगा आणि बाळासाहेब ठाकरे (Balalsaheb Thakarey) यांचा नातू असलेल्या आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावरून भरपूर वाद निर्माण झाला होता. आधी काहीसे मवाळ असलेल्या आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर मात्र आपली भूमिका आक्रमक केली. शिवसेनेला सावरण्यासाठी सगळ्यात मोठा आधार आणि शिवसेनेचं उगवतं नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरेंकडे पाहिलं जातं. थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले ठाकरे घराण्यातले ते पहिले व्यक्ती ठरले.

आदित्य ठाकरे यांचा जन्म 13 जून 1990 रोजी मुंबईत झाला. शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे त्यांचे वडील, तर त्यांच्या आईचं नाव रश्मी ठाकरे (Rashmi Thakarey). मुंबईतल्या बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून आदित्य यांचं शालेय शिक्षण झालं. त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून इतिहास आणि के. सी. कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली आहे. 2009 सालच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेसाठी प्रचारही केला होता. 2010 मध्ये युवा सेनेच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरेंची निवड झाली. युवा सेनेच्या (Yuva Sena) माध्यमातूनच आदित्य ठाकरे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 2010 मध्ये प्रसिद्ध लेखक रोहिंग्टन मिस्त्री यांच्या 'सच ए लाँग जर्नी' या पुस्तकाच्या विरोधात त्यांनी निदर्शनं केली होती. इतकंच नाही, तर ते पुस्तक जाळलंही होतं.

मुंबईतलं नाइट लाइफ सुरू राहावं, यासाठी मुंबईतले पब्ज आणि नाइट क्लब्ज रात्रभर उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात यावी असा प्रस्ताव त्यांनी 2016 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. या प्रस्तावावर बरेच वादविवादही झाले. 'व्हॅलेंटाइन डे'ला शिवसेनेचा असलेला कट्टर विरोध आदित्य ठाकरे यांच्यामुळे काहीसा मवाळ झाला असं म्हटलं जातं. विद्यार्थी, तरुणांसाठी त्यांनी विविध आंदोलनं केली. 2018 मध्ये त्यांना शिवसेनेतलं अत्यंत महत्त्वाचं नेतेपद देण्यात आलं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना मुंबईच्या वरळी मतदारसंघातून (Worli Constituency) शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश माने यांचा 67,427 मतांनी पराभव करून ते विजयी झाले. त्यानंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे यांना थेट कॅबिनेट मंत्रिपद (Cabinet Minister) देण्यात आलं. पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार खात्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती.

आदित्य ठाकरे यांना कलेचा वारसा कुटुंबातूनच मिळाला आहे. आदित्य ठाकरे हे चांगले कवी आहेत. शाळेत असतानाच ‘माय थॉट इन ब्लॅक अँड व्हाइट’ हा त्यांचा इंग्रजी काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता. मराठी आणि हिंदीतही त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. ‘उम्मीद’ हा त्यांनी लिहिलेल्या हिंदी गाण्यांचा अल्बमही प्रकाशित झाला आहे. कैलाश खेर, शंकर महादेवन, सुनिधी चौहान यांनी या अल्बममधली गाणी गायली आहेत. लहानपणापासूनच आदित्य ठाकरेंना क्रिकेट खेळण्याची आवड आहे. आजही व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून क्रिकेट खेळायला त्यांना आवडतं.

मुंबईच्या प्रसिद्ध राणीच्या बागेत पेंग्विन्स यावेत यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्याबद्दल त्यांच्यावर भरपूर टीकाही झाली होती. आमदार होण्यापूर्वी महाराष्ट्रात प्लास्टिकबंदीसारख्या महत्त्वाच्या योजनांचा पाठपुरावा करण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. शिवसेनेचे यूथ आयकॉन (Shiv Sena Youth Icon) समजले जाणारे आदित्य ठाकरे आणि वाद हे एक समीकरण आहे. बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्याशी त्यांचं नाव जोडलं गेलं होतं. यावर आदित्य ठाकरे यांनी कधीही प्रतिक्रिया दिली नाही. तसंच सुशांतसिंह राजपूतच्या कथित आत्महत्या प्रकरणातही आदित्य ठाकरे यांचा संबंध असल्याचे आरोप झाले होते; पण तपासात काही निष्पन्न झालं नाही. जून 2022मध्ये एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर आदित्य ठाकरेंचं नवं रूप सगळ्यांना दिसलं. शिवसेनेसाठी त्यांनी महाराष्ट्रात शिवसंवाद यात्रा काढली. एकनाथ शिंदे गटाबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर बरीच टीकाही झाली. उच्चशिक्षित तरुण चेहरा असल्याने आदित्य ठाकरे तरुणवर्गात विशेष लोकप्रिय आहेत.

अजून दाखवा …

सर्व बातम्या

सुपरहिट बॉक्स

Fast Charging स्मार्टफोनसाठी खरंच फायद्याची? एकदा अवश्य घ्या जाणून
WhatsApp च्या कोट्यवधी यूझर्ससाठी गुडन्यूज! आलंय नवं फीचर
अचानक पहिलं प्रेम डोळ्यासमोर येईल! आजचं लव्ह राशीफळ कोणासाठी कसं असेल
OnePlus ते Realme पर्यंत! हे आहेत 3 हजार रुपयांच्या आतील बेस्ट Earbuds
PM Kisan Yojana : या तारखेला येणार PM Kisan योजनेचा 19 वा हप्ता
बळीराजाचा देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मान होणार, पुरस्कारासाठी नोंदणी सुरू
कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या 5 महिला शेतकरी तुम्हाला माहीत आहेत का?
Tata, Mahindra विसरा, भारतात येतेय सर्वात स्वस्त EV कार, किंमत फक्त 4 लाख!
Bajaj ने टाकला मोठा डाव, आणतेय 137 किमी चालणारी मजबूत स्कूटर!
दहा गुंठ्यातून लाखोंचा नफा, झेंडू उत्पादक शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल