TRENDING:
advertisement

गौतमी पाटील बातम्या (Gautami Patil News)

सोशल मीडियामुळे सर्वसामान्यांनाही आपले कला-गुण सर्वांसमोर सादर करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झालाय. सोशल मीडियावर एखादा फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक जण रातोरात प्रसिद्धीच्या झोतात येतात, सर्वत्र त्यांची चर्चा होते आणि ते लोकप्रियही होतात. लोकांना त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढते. त्यामुळे त्यांच्या सोशल मीडिया फॉलोअर्सची संख्याही झपाट्याने वाढते. महाराष्ट्रातही सोशल मीडियामुळे चर्चेत आलेलं असंच एक नाव म्हणजे गौतमी पाटील

सप्टेंबर 2022मध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये डान्स करणाऱ्या गौतमीचे हावभाव पाहून वादाला तोंड फुटलं होतं. सार्वजनिक ठिकाणी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गौतमीने विचित्र हावभाव करून, अंगावर पाणी ओतून नृत्य केलं होतं. त्यानंतर ती वादाच्या भोवऱ्यात सापडली. अनेकांनी गौतमी पाटीलला तिच्या या आक्षेपार्ह नृत्यामुळे ट्रोल करायला सुरुवात केली. विठाबाई नारायणगावकर, मंगला बनसोडे, शाहीर पठ्ठे बापूराव, सुरेखा पुणेकर यांच्यासारख्या कलाकारांनी जपलेली लावणीची कला धुळीत मिळवण्याचं काम गौतमीसारखे सोशल मीडिया स्टार करत असल्याची टीका झाली. त्यानंतर गौतमीने सर्वांची जाहीर माफी मागितली होती. 

टीका झाली असली, तरी तिच्या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आणि याबाबत बऱ्याच बातम्यादेखील आल्या. त्यामुळे त्या काळात तिची खूप चर्चा झाली. परिणामी तिच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्येही वाढ झाली. तिला लावणी नृत्यांगना म्हणून ओळखलं जातं. अनेक कार्यक्रमांत डान्स करण्यासाठी गौतमीला बोलावलं जातं. गौतमी पाटीलचे डान्स व्हिडिओ यू-ट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. 

गौतमी पाटीलने News18 Local ला दिलेल्या माहितीनुसार, ती मूळची धुळे जिल्ह्यातली आहे. 2022 साली तिचं वय 26 वर्षं आहे. गौतमीचं शिक्षण केवळ दहावीपर्यंत झालंय. ते शिक्षण तिने धुळ्यातल्या आपल्या सिंदखेडा या गावी घेतलं आहे. साधारणतः 2012-13पासून ती या क्षेत्रामध्ये आहे. गौतमीने डान्सचं कुठेही, कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण घेतलेलं नाहीये. इतरांचं नृत्य पाहून आपण नृत्य करायला शिकल्याचं गौतमीने सांगितलं. गौतमीच्या आई-वडिलांबद्दल किंवा कुटुंबीयांबद्दल फार माहिती समोर आलेली नाही, तसंच ती सिंगल असल्याचं तिने सांगितलं. official_gautami94_ हे तिचं ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंट आहे. तिला क्रिकेट पाहायला खूप आवडतं. तसंच डोंगराळ भाग आणि बीचेसवर फिरायला खूप आवडतं.

ऑक्टोबर 2022 याच वर्षी गौतमीबाबत आणखी एक वाद निर्माण झाला. सांगली जिल्ह्यातल्या बेडग इथं एका सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथे गौतमीच्या डान्सचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तिच्या या लावणी कार्यक्रमात तुफान गर्दी झाली. तरुणांनी तिच्या कार्यक्रमासाठी एकच गर्दी केल्यामुळे गोंधळ उडाला. जमलेले काही तरुण जिल्हा परिषद शाळेच्या छतावर चढून कार्यक्रम पाहत होते. त्यामुळे शाळेच्या कौलांचा चुराडा झाला. प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केली आणि शाळेची कौलं फुटली. एवढंच नाही, तर तार जाळीच्या कंपाउंडचंही नुकसान झालं. अनेक झाडंही कोसळली. या लावणीच्या कार्यक्रमाने शिक्षकांनाही भान उरलं नाही आणि त्यांनीही ठेका धरला होता. शिक्षक लावणीच्या गाण्यावर नाचतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. तिचा डान्स आणि हुल्लडबाजीवरून वाद निर्माण झाला होता. याशिवाय, कार्यक्रम परिसराच्या बाहेर एक मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आला होता. त्या प्रकरणाचीही बरीच चर्चा झाली.

अजून दाखवा …

सर्व बातम्या

सुपरहिट बॉक्स

Fast Charging स्मार्टफोनसाठी खरंच फायद्याची? एकदा अवश्य घ्या जाणून
WhatsApp च्या कोट्यवधी यूझर्ससाठी गुडन्यूज! आलंय नवं फीचर
अचानक पहिलं प्रेम डोळ्यासमोर येईल! आजचं लव्ह राशीफळ कोणासाठी कसं असेल
OnePlus ते Realme पर्यंत! हे आहेत 3 हजार रुपयांच्या आतील बेस्ट Earbuds
PM Kisan Yojana : या तारखेला येणार PM Kisan योजनेचा 19 वा हप्ता
बळीराजाचा देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मान होणार, पुरस्कारासाठी नोंदणी सुरू
कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या 5 महिला शेतकरी तुम्हाला माहीत आहेत का?
Tata, Mahindra विसरा, भारतात येतेय सर्वात स्वस्त EV कार, किंमत फक्त 4 लाख!
Bajaj ने टाकला मोठा डाव, आणतेय 137 किमी चालणारी मजबूत स्कूटर!
दहा गुंठ्यातून लाखोंचा नफा, झेंडू उत्पादक शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल