TRENDING:
advertisement

देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या (Devendra Fadnavis News)

tag-image

सलग 5 वर्षं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद भूषवणारे पहिले बिगरकाँग्रेसी नेते म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं नाव इतिहासात नोंदवलं गेलं आहे. राज्याचे दुसरे सगळ्यात तरुण मुख्यमंत्री, राज्याचे दुसरे ब्राह्मण मुख्यमंत्री, सगळ्यात तरुण नगरसेवक असे विक्रम नावावर असणारे देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणातले चाणक्य म्हणूनही संबोधलं जातं. भाजपचे नगरसेवक ते राज्याचे मुख्यमंत्री एवढा मोठा पल्ला गाठल्यानंतर ‘किंगमेकर’ अशीही ओळख त्यांनी निर्माण केली आहे. जून 2022म ध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर त्यांच्यासोबत सरकार स्थापन करणारे देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा अंदाज होता; पण एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देऊन स्वतः बाहेर राहणार असल्याचं त्यांनी घोषित केलं; मात्र नंतर पक्षादेशाचा सन्मान करण्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं.

नागपूर नैर्ऋत्य विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. 31 ऑक्टोबर 2014 रोजी वयाच्या 44 व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वांत तरुण मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या घरात लहानपणासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वातावरण होतं. त्यांचे वडील गंगाधरपंत यांच्याकडून राजकीय आणि सामाजिक कार्याचं बाळकडू मिळालेले देवेंद्र फडणवीस पुढे भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष झाले.

देवेंद्र फडणवीस यांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी नागपूरमध्ये झाला. नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतलेल्या फडणवीस यांनी आपल्या राजकीय युक्तिवादांमध्ये त्याची प्रचिती दिली आहे. त्यांची विचारसरणी लहानपणापासूनच एवढी पक्की होती, की त्यांच्या शाळेच्या नावात ‘इंदिरा’ असल्याने त्यांनी ती शाळाच बदलली. पुढे सरस्वती विद्यालयात त्यांचं शिक्षण झालं. त्यांनी धरमपेठ विद्यालयातून कॉमर्सची आणि कायद्याची पदवी घेतली. त्यात त्यांनी गोल्ड मेडल पटकावलं. फडणवीस यांच्या कुटुंबामध्ये त्यांची आई, पत्नी अमृता (Amruta Fadnavis) आणि मुलगी दिविजा यांचा समावेश आहे. फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली. काही महिन्यांतच एक अभ्यासू नेतृत्व म्हणून ते उदयास आले. विरोधी बाकांवर बसतानाही पूर्ण अभ्यास करून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करणाऱ्या फडणवीसांनी त्यांच्या वक्तृत्व कौशल्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. उच्च शिक्षित, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व, उत्तम वक्तृत्व यामुळे तरुण आणि मध्यमवर्गीयांमध्ये फडणवीस विशेष लोकप्रिय आहेत. एके काळी त्यांनी मॉडेलिंगही केलं आहे.

विद्यार्थिदशेपासूनच चळवळीत उतरलेल्या फडणवीस यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून (ABVP) कामाला सुरुवात केली. त्यांचे वडील गंगाधर फडणवीस अनेक वर्षं विधान परिषदेचे आमदार होते. त्यांचं निधन झालं तेव्हा देवेंद्र फक्त 17 वर्षांचे होते. तिथून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. 1992 मध्ये ते 22 व्या वर्षी नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. वास्तविक ही निवडणूक 1989 मध्ये होणार होती, तेव्हा त्या निवडणुकीत त्यांचं वय भरत नव्हतं; मात्र ती निवडणूक पुढे ढकलली गेली आणि फडणवीसांना निवडणुकीला उभं राहता आलं. इतक्या कमी वयात नगरसेवक होणारे तेव्हा ते पहिलेच उमेदवार ठरले होते. 1997मध्ये ते नागपूरचे महापौर झाले. नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासातले ते सर्वांत तरुण महापौर आणि देशातले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत तरुण महापौर ठरले होते. 1999 मध्ये ते विधानसभेमध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून गेले. पश्चिम नागपूर मतदारसंघातून ते निवडून गेले होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण, तेलगी घोटाळा, सिंचन घोटाळा, क्रिमी लेअर उत्पन्न वाढवण्याची मर्यादा आदी विषय त्यांनी अभ्यासूपणे मांडले.

2013 मध्ये त्यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. 2014 मध्ये मुख्यमंत्रिपदावर (CM In 2014) विराजमान होण्यासाठी प्रदेशाध्यक्षपद त्यांना फायद्याचं ठरलं. सत्तेच्या 5 वर्षांच्या काळात फडणवीस यांनी शिवसेनेची नाराजी सक्षमपणे हाताळत सरकार चालवून दाखवलं. त्यात मराठा आरक्षण आंदोलन अतिशय समंजसपणे हाताळून त्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची दारं खुली करून दिली. ‘देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ अशा घोषणा त्यांच्या समर्थकांकडून दिल्या जातात. 2019 च्या निवडणुकीनंतर शिवसेना अडून बसल्यामुळे 26 नोव्हेंबरला पहाटे अचानक फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सर्वांनाच धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबतचं हे सरकार टिकलं नाही. तरीही 80 तासांचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला गेला.

विधिमंडळातल्या त्यांच्या युक्तिवादांमधली आकडेवारी, संदर्भ यांमुळे त्यांच्या युक्तिवादांना आव्हान देणं विरोधकांना कठीण जातं. फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे आवडते असल्याचं बोललं जातं; पण राज्यात मात्र त्यांना पक्षांतर्गत विरोधाला सामोरं जावं लागलं होतं. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाचं सरकार आल्यानंतर पक्षादेश महत्त्वाचा मानून फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं. त्यांचं डिमोशन झाल्याची चर्चा सर्वत्र झाली; मात्र आपण भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता असल्याने पक्षादेश अंतिम मानत असल्याचं सांगून त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिला.

अजून दाखवा …

सर्व बातम्या

सुपरहिट बॉक्स

Fast Charging स्मार्टफोनसाठी खरंच फायद्याची? एकदा अवश्य घ्या जाणून
WhatsApp च्या कोट्यवधी यूझर्ससाठी गुडन्यूज! आलंय नवं फीचर
अचानक पहिलं प्रेम डोळ्यासमोर येईल! आजचं लव्ह राशीफळ कोणासाठी कसं असेल
OnePlus ते Realme पर्यंत! हे आहेत 3 हजार रुपयांच्या आतील बेस्ट Earbuds
PM Kisan Yojana : या तारखेला येणार PM Kisan योजनेचा 19 वा हप्ता
बळीराजाचा देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मान होणार, पुरस्कारासाठी नोंदणी सुरू
कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या 5 महिला शेतकरी तुम्हाला माहीत आहेत का?
Tata, Mahindra विसरा, भारतात येतेय सर्वात स्वस्त EV कार, किंमत फक्त 4 लाख!
Bajaj ने टाकला मोठा डाव, आणतेय 137 किमी चालणारी मजबूत स्कूटर!
दहा गुंठ्यातून लाखोंचा नफा, झेंडू उत्पादक शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल