आपल्या शहरातलं हवामान, हवामानाचा अंदाज आणि अपडेट्स (Weather at my location)मिळणं गरजेचं आहे. हवामानाच्या अचूक अंदाजासाठी आणि खात्रीशीर माहितीसाठी भारतीय हवामान खात्याच्या (Indian Meteorological Department, IMD)वेबसाइटवर अधिकृत माहिती मिळू शकते. याशिवाय अॅक्युवेदरसारख्या काही वेबसाइट्सही तुमच्या शहरातल्या, गावातल्या हवामानाविषयी अपडेट्स देत असतात. हवामानासंबंधी बातम्यांचा परिणाम शेतकरी, व्यापारी यांच्यावर होतोच पण तो सर्वसामान्यांच्या दैनंदिव जीवनावर थेटपणे होत असतो.

हवामानाचा अंदाज आणि हवामान खात्याने दिलेले इशारे (Weather Alerts) वेळेवर कळले तर अनेक संकटांपासून वाचता येईल. गेल्या काही वर्षांत अचूक हवामान अंदाज वर्तवणं आधुनिक विज्ञानामुळे शक्य होत आहे.

हवामानातल्या तीव्र बदलांचा थेट दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो. थंडीची लाट, उन्हाचा कहर, अवकाळी पाऊस, वादळ, चक्रीवादळ किंवा अतिवृष्टी, विजांचा कडकडाटाचा फटका बसून जीवितहानी आणि वित्तहानी होऊ शकते.

गेल्या काही वर्षांत भारताला हवामान बदलांचा, ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसला आहे. त्यामुळे अतितीव्र उन्हाळा, अतिवृष्टी, चक्रीवादळं आणि अवकाळी पावसासारखी संकटं वारंवार येताना दिसतात.

महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टीवर गेल्या काही वर्षांत तीव्र चक्रीवादळं धडकली. त्याचा मोठा फटका बसला आहे. मुंबईलाही चक्रीवादळाचा फटका बसला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि विजा पडून अनेक जणांचे जीव गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वादळ असे तीव्र हवामानाचे इशारे IMD तर्फे दिले जातात. त्याची ताजी माहिती पोहोचली, तर किमान जीवितहानी टाळण्यास मदत होऊ शकते.

अजून दाखवा …